Baramati By-Election : रिश्ते मायने रखते है...; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बोलावले तर जाण्याचे सुप्रिया सुळेंचे संकेत 
महाराष्ट्र

Baramati By-Election : रिश्ते मायने रखते है...; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बोलावले तर जाण्याचे सुप्रिया सुळेंचे संकेत

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या चर्चाना तोंड फुटले आहे. 'रिश्ते मायने रखते है...', असे म्हणत त्यांनी कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले. पैसा आणि सत्ता यापेक्षा नातेसंबंध अधिक महत्त्वाचे असतात, असे सांगताना सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराबाबतही सूचक भूमिका मांडली आहे.

Swapnil S

मुंबई : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या चर्चाना तोंड फुटले आहे. 'रिश्ते मायने रखते है...', असे म्हणत त्यांनी कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले. पैसा आणि सत्ता यापेक्षा नातेसंबंध अधिक महत्त्वाचे असतात, असे सांगताना सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराबाबतही सूचक भूमिका मांडली आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला जाणार का, या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी थेट उत्तर देण्याऐवजी वेगळाच दृष्टिकोन मांडला. त्यामुळे बारामतीतील राजकारणात वेगळाच रंग भरला आहे.

'बिनविरोध'ची जबाबदारी अजित पवार गटाचीच...

हा प्रश्न अजित पवार पक्षाच्या गटाने विचारायला हवा असे सांगत त्यांनी, जर त्यांच्याकडून बोलावणे आले, तर प्रचारासाठी जाण्याचा आपण विचार करू शकतो, असे त्यांनी सूचित केले. त्यामुळे कुटुंबातील नातेसंबंध आणि राजकारण यातील समतोल कसा साधला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही, यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रक्रियेची जबाबदारी अजित पवार गटाकडे होती, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका केली. याबाबतचे उत्तर अजित पवार गटालाच विचारावे, असे म्हणत त्यांनी या प्रश्नाला बगल त्यामुळे पवार कुटुंबातील नातेसंबंध दिली. तसेच निवडणुकीच्या अजूनही मजबूत असल्याचा संदेश काळात कार्यकर्ते उत्साहाने त्यांनी दिला. बारामती निवडणूक लढवतात, त्यामुळे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आधीच स्पर्धा होणे स्वाभाविक असल्याचेही जाहीर झाला आहे. ३० मार्च २०२६ त्यांनी नमूद केले.

संपूर्ण कुटुंब सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी...

दरम्यान, सुप्रिया सुळे या पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आल्या असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कुटुंबाच्या ऐक्याचा उल्लेख करत, संपूर्ण कुटुंब सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी आहे, असे त्यांनी सांगितले.

त्यामुळे पवार कुटुंबातील नातेसंबंध अजूनही मजबूत असल्याचा संदेश त्यांनी दिला. बारामती पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आधीच जाहीर झाला आहे. ३० मार्च २०२६ रोजी अधिसूचना जारी झाली असून ६ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. ७एप्रिल रोजी अर्जाची छाननी झाली, तर ९ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. मतदान २३ एप्रिल रोजी होणार असून मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ६ मेपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

२३ उमेदवार रिंगणात; २३ एप्रिलला मतदान

या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतल्याचेही दिसून आले. एकूण ५३ उमेदवारांपैकी ३० जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनीही माघार घेतल्याने चर्चांना उधाण आले. मात्र, अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे-शर्मा यांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे आता बारामतीत एकूण २३ उमेदवार रिंगणात असून, २३ एप्रिलला होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी