रायगड पोलीस दलात K-९ कमांडो 'बघिरा'ची एण्ट्री; स्फोटक शोधमोहिमांना मिळणार बळ 
महाराष्ट्र

रायगड पोलीस दलात K-९ कमांडो 'बघिरा'ची एण्ट्री; स्फोटक शोधमोहिमांना मिळणार बळ

रायगड पोलीस दलाच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकात नव्या K-९ कमांडोची भर पडली असून, 'बधिरा' या बेल्जियन मॅलिनॉइस जातीच्या श्वानाचा अधिकृत समावेश करण्यात आला आहे.

Swapnil S

अलिबाग : रायगड पोलीस दलाच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकात नव्या K-९ कमांडोची भर पडली असून, 'बधिरा' या बेल्जियन मॅलिनॉइस जातीच्या श्वानाचा अधिकृत समावेश करण्यात आला आहे. रायगड पोलिस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, यापूर्वी कार्यरत असलेला 'मॅक्स' हा श्वान नियत वयोमानानुसार सेवामुक्त झाल्यानंतर त्याच्या जागी 'बधिरा'ची नियुक्ती करण्यात आली आहे.

बेल्जियन मॅलिनॉइस ही जात अत्यंत बुद्धिमान, चपळ आणि सुरक्षा दलांमध्ये विशेष कामगिरीसाठी प्रसिद्ध मानली जाते. 'बधिरा' रायगड पोलीस दलात दाखल झाला तेव्हा त्याचे वय सुमारे नऊ आठवडे होते. या श्वानाचे नामकरण रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. 'बधिरा'ला भविष्यात स्फोटक पदार्थ शोधक (Explosive Detection Dog) तसेच स्निफर डॉग म्हणून प्रशिक्षित करण्यात येणार आहे. प्राथमिक टप्प्यात त्याला रायगड-अलिबाग पोलीस मुख्यालय येथे पाच महिन्यांचे बेसिक ओबिडियन्स प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर पुढील सात महिन्यांत विशेष स्फोटक शोध प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली. रायगड पोलीस दलातील कर्तव्यात श्वान पथकाने यापूर्वी विविध गुन्ह्यांची उकल, स्फोटक शोधमोहिमा तसेच विशेष बंदोबस्ताच्या उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्याच परंपरेत 'बघिरा' आधुनिक प्रशिक्षण घेऊन पोलीस दलासाठी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग