महाराष्ट्रातील १६ शहरांत 'भारत गॅस लाइट झिप' सेवा सुरू; हलक्या वजनाचे कंपोझिट सिलिंडर; त्वरित नवीन कनेक्शनसह एक्स्प्रेस डिलिव्हरीची सुविधा X
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील १६ शहरांत 'भारत गॅस लाइट झिप' सेवा सुरू; हलक्या वजनाचे कंपोझिट सिलिंडर; त्वरित नवीन कनेक्शनसह एक्स्प्रेस डिलिव्हरीची सुविधा

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये 'भारत गॅस लाइट झिप' ही प्रीमियम एलपीजी सेवा सुरू केली आहे.

Swapnil S

उरण : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये 'भारत गॅस लाइट झिप' ही प्रीमियम एलपीजी सेवा सुरू केली आहे. मुंबई, कल्याण, रायगड, पुणे, नागपूर, पालघर, भिवंडी, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, सांगली, सोलापूर आणि वसई-विरार या शहरांचा या विस्तारात समावेश आहे.

बीपीसीएलने देशभरातील १०० शहरांमध्ये 'भारत गॅस लाइट झिप' सेवेचा विस्तार केला असून, महाराष्ट्र हा या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. १८ जुलै रोजी मुंबईत या सुविधेचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर आता राज्यातील अन्य प्रमुख शहरांमध्येही ती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याशिवाय, नव्या ग्राहकांसाठी 'इन्स्टंट न्यू कनेक्शन' ची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे भारतगॅसचे नवीन एलपीजी कनेक्शन घेण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. 'एक्स्प्रेस डिलिव्हरी'च्या माध्यमातून सिलिंडरची जलद डिलिव्हरी करण्याची सुविधाही ग्राहकांना मिळणार आहे. नोकरी करणारे व्यावसायिक, विद्यार्थी, तरुण कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक तसेच स्थलांतरित लोकसंख्येसाठी अधिक सोयीस्कर एलपीजी अनुभव उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सेवा विकसित करण्यात आली आहे. सोय, वेग आणि सुलभ उपलब्धता यावर या सेवेत विशेष भर देण्यात आला आहे.

'भारत गॅस लाइट झिप'च्या माध्यमातून पारंपरिक सिलिंडर वितरणाच्या पलीकडे जाऊन ग्राहककेंद्री एलपीजी सेवा देण्याचा बीपीसीएलचा प्रयत्न आहे. देशभरातील १०० शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध झाल्याने अधिकाधिक ग्राहकांना हलका सिलिंडर, सुलभ नवीन कनेक्शन आणि जलद डिलिव्हरीचा लाभमिळणार आहे.

भारत गॅस लाइट झिप ही एलपीजीची उपलब्धता अधिक सोपी, जलद आणि सुविधाजनक करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हलक्या वजनाच्या कंपोझिट सिलिंडरसह इन्स्टंट न्यू कनेक्शन आणि एक्स्प्रेस डिलिव्हरी या सुविधांची सांगड घालून आजच्या बदलत्या जीवनशैलीच्या गरजा पूर्ण करणारा ग्राहक अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
संजय खन्ना, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बीपीसीएल

आधुनिक कुटुंबांसाठी उपयुक्त

'भारत गॅस लाइट झिप 'मध्ये हलक्या वजनाचा, गंजरोधक आणि पारदर्शक कंपोझिट सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आला आहे. पारदर्शक रचनेमुळे सिलिंडरमध्ये शिल्लक असलेल्या एलपीजीची पातळी ग्राहकांना सहज पाहता येते. पारंपरिक सिलिंडरच्या तुलनेत हा सिलिंडर हाताळण्यास अधिक सोपा असल्याने आधुनिक कुटुंबांसाठी तो उपयुक्त ठरणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पदपथांवरील 'आरे' स्टॉलवरही हातोडा; 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत BMC करणार कारवाई; मुंबईतील १६०३ स्टॉलधारकांवर टांगती तलवार

तुकाराम मुंढे 'इफेक्ट'मुळे सलग दूध संकलनात घट; तीन महिन्यांत सव्वा लाख लिटरची घट, भेसळखोरांनी घेतला धसका

आयआयटी मुंबईच्या ६२० संशोधकांना PHD; एकाच शैक्षणिक वर्षात गाठला संशोधनातील ऐतिहासिक टप्पा

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

JNPT येथून पहिली 'डबल-स्टॅक लाँग-हॉल' कंटेनर ट्रेन धावली; ३६० टीईयू माल घेऊन ४२२ किमीचा प्रवास वेळ वाचणार; पोर्टवरील गर्दी कमी होणार