महाराष्ट्र

Nashik : ग्रामपंचायत भार्डीचे नाव बदलून कोंढार; कोंढारकरांना पन्नास वर्षांनी मिळाला न्याय

मूळ नाव एक, पण कागदोपत्री वेगळे अशा कात्रीत सापडलेल्या नांदगावमधील एका गावाची दैवी कारवाई अखेर संपुष्टात आली आहे. नांदगाव तालुक्यातील कोंढार गाव आता खऱ्या अर्थाने गावपण अनुभवू लागले आहे, कारण ग्रामपंचायतचे नाव भार्डीपासून बदलून कोंढार करण्यात आले आहे.

Swapnil S

नाशिक: मूळ नाव एक, पण कागदोपत्री वेगळे अशा कात्रीत सापडलेल्या नांदगावमधील एका गावाची दैवी कारवाई अखेर संपुष्टात आली आहे. नांदगाव तालुक्यातील कोंढार गाव आता खऱ्या अर्थाने गावपण अनुभवू लागले आहे, कारण ग्रामपंचायतचे नाव भार्डीपासून बदलून कोंढार करण्यात आले आहे.

नांदगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींपैकी एक म्हणजे भार्डी. १९६६ मध्ये भार्डी ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन कोंढार गाव स्वतंत्र ओळखले जाऊ लागले, परंतु ग्रामपंचायतच्या मालकीच्या कागदपत्रांवर भोगवटादारांच्या नावाच्या ठिकाणी जुने नाव भार्डीच राहिले. त्यामुळे गावाचे नाव कोंढार, परंतु कागदपत्रावर भार्डी, अशी विसंगती निर्माण झाली. या विसंगतीमुळे विविध सरकारी योजना आणि लाभ घेण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या.

आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण  निर्णय

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला; ISMAच्या बैठकीतील आकडेवारी, एकूण ३२४ लाख टनपैकी राज्याचा वाटा ११८ लाख टन

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले

AI क्रांती ‘वायटूके’सारखी; व्यापार मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन; भारतीय कंपन्यांना फायदा होणार, नोकऱ्यांबाबत चिंता नको