नैऋत्य मान्सूनसंदर्भात भारतीय हवामान विभागानं(Indian Meteorological Department) मोठी घोषणा केली आहे. २५ सप्टेंबरनंतर पश्चिम राजस्थानातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात(Maharashtra)आज आणि उद्या चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पाच ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे.
यंदा पावसाने देशातील काही राज्यांमध्ये चांगली हजेरी लावली आहे. मात्र, काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा केली जात आहे. काही ठिकाणी पिकांनी अजूनही पाण्याची गरज आहे. पाण्या अभावी पीक वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीतच परतीच्या मान्सूनचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील बऱ्याच भागात बापसाची प्रतिक्षा केली जात आहे. सध्या राज्यातील बऱ्यापैकी जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. दरम्यान, सध्य राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना पावसाची गरज आहे. पाण्याअभावी पुर्ण हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.