संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

Nashik Municipal Corporation : नाशिकमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत; उत्तर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसह राजकारणातील दबदबा वाढला

राज्यातील इतर महापालिका निवडणुकीतही भाजपला प्रचंड यश मिळाले असून, २९ पैकी २६ महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होणार असल्याचे जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

Swapnil S

नाशिक : नाशिक महानगरपालिकेत मागील वेळी ६६ नगरसेवक होते, आता ७६ झाले असून १० नगरसेवकांची वाढ झाली आहे. एबी फॉर्मचे वाटप करत असताना काही गोंधळ निर्माण झाला, ज्यामुळे अंदाजे १० ते १५ जागा हातच्या गेल्या, तरीही भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

यासोबतच, राज्यातील इतर महापालिका निवडणुकीतही भाजपला प्रचंड यश मिळाले असून, २९ पैकी २६ महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होणार असल्याचे जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

या निकालांमुळे भाजपच्या सत्तास्थापनेसह राज्यातील महापालिका राजकारणात त्यांचा दबदबा अधिक स्पष्ट झाला आहे.पुढे बोलताना जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, जळगाव महापालिकेत भाजपने दिलेले ४६ पैकी ४६ उमेदवार विजयी झाले असून, पक्षाला येथे स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे, अहिल्यानगरमध्येही महायुतीची सत्ता आली आहे.

मंत्री महाजन म्हणाले, "उत्तर महाराष्ट्रात आमदार, नगर परिषद, नगरपालिका आणि आता महापालिकांमध्ये भाजपने स्पष्ट विजय मिळवून १०० टक्के सत्तास्थापना केली आहे." यामुळे भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसह राजकारणातील दबदबा अधिक दृढ झाला आहे.

Mumbai : कंत्राटदारांना १२.५ कोटींचा दंड; मेट्रो मार्गिका ९ वर सुरक्षेचा भंग

Navi Mumbai : क्रेन कोसळून दोघा कामगारांचा मृत्यू

Pune : उत्सवामध्ये लाऊडस्पीकरच्या मर्यादांचे पालन करा! गिरीश महाजन यांचे आवाहन

Goa : अभिनेत्याच्या कारची बाप-लेकाच्या दुचाकीला जोरदार धडक; मदतीऐवजी स्थानिकांशी वाद, पत्नीवरही 'थुंकल्याचा' आरोप

विकसित भारतासाठी बँकिंग! सरकार उच्चस्तरीय समिती स्थापन करणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा