महाराष्ट्र

राधाकृष्ण विखे-पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; सुमारे तासभर चर्चा

विधानसभेची निवडणूक लढण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांची २० ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आल्याचे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली.

Swapnil S

जालना : विधानसभेची निवडणूक लढण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांची २० ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आल्याचे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली.

विखे-पाटील आणि जरांगे यांच्यात आठवडाभरात दुसऱ्यांदा भेट झाली. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जरांगे यांची भेट घेतल्यानंतर विखे-पाटील आणि जरांगे यांच्यात चर्चा झाली आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीची दिशा ठरविण्यासाठी जरांगे यांनी २० ऑक्टोबरला बैठक बोलाविली आहे. त्यामुळे त्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

जरांगे यांनी महायुतीवर विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढविल्यानंतर ही भेट झाल्याने त्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. जरांगे यांनी उमेदवार रिंगणात उतरविले, तर मुख्यत्वे भाजपचे आणि सर्वसाधारणपणे महायुतीचे राजकीय नुकसान होणार आहे, असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक