औषध निर्मिती कंपनीच्या परवाना निलंबनाला HC कडून तात्पुरती स्थगिती; मंत्र्यांनी अपिलावर तातडीने सुनावणी घेण्याचेही दिले निर्देश 
महाराष्ट्र

औषध निर्मिती कंपनीच्या परवाना निलंबनाला HC कडून तात्पुरती स्थगिती; मंत्र्यांनी अपिलावर तातडीने सुनावणी घेण्याचेही दिले निर्देश

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी कंपनीच्या अपिलावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, तोपर्यंत परवाना निलंबनाच्या आदेशाला स्थगिती कायम राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर येथील वाळूंज औद्योगिक वसाहतीतील...

Swapnil S

मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील वाळूंज औद्योगिक वसाहतीतील ‘क्युरिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या औषध निर्मिती परवान्याचे निलंबन उच्च न्यायालयाने तात्पुरते स्थगित केले.

याचवेळी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी कंपनीच्या अपिलावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, तोपर्यंत परवाना निलंबनाच्या आदेशाला स्थगिती कायम राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मुख्य न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

अमेरिकेतील ‘क्युरिया ग्रुप’चा भाग असलेल्या क्युरिया इंडियाच्या वाळूज येथील कारखान्यात औषधांसाठी लागणारे सक्रिय घटक तयार केले जातात. औषध आणि सौंदर्यप्रसाधने कायदा व नियमांचे उल्लंघन आणि १६ त्रुटी आढळल्याने छत्रपती संभाजीनगर विभागाच्या सहआयुक्तांनी ३० ऑक्टोबर रोजी कंपनीचा परवाना २१ दिवसांसाठी निलंबित केला होता. या कारवाईविरोधात कंपनीने ३ नोव्हेंबरला एफडीए मंत्र्यांकडे अपील दाखल केले होते.

या अपिलावर सुनावणी घेऊन तातडीने निर्णय देण्याचे निर्देश मंत्र्यांना द्यावेत, अशी मागणी कंपनीने उच्च न्यायालयात केली होती. कंपनीच्या वतीने ज्येष्ठ वकील बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. जानेवारी २०२४ मधील अशाच एका प्रकरणात उच्च न्यायालयाने अपिलावर निर्णय होईपर्यंत निलंबन आदेशाला अंतरिम स्थगिती दिली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राज्यात हवामान बदलणार; दिवसा उन्हाचा चटका, रात्री थंडीचा कडाका; IMD चा मोठा अंदाज

'पॅन' अन् 'मतदार कार्ड' नागरिकत्वाचा पुरावा नाही; गुवाहाटी उच्च न्यायालयाने फेटाळला दावा

देवेंद्र फडणवीस-तटकरे भेट; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोरात

मुंबईतील ४३ बेकऱ्यांना BMC ने टाळे ठोकले; स्वच्छ इंधनाचा वापर न केल्याने परवाने रद्द

मदर डेअरी, अमूल दूध महागले; प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू