संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

राज्यातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न; इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणेही अनिवार्य, येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी : दादा भुसे

परिपूर्ण समाज घडविण्यासाठी राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधान परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणेही बंधनकारक करण्यात आल्याचे ते म्हणाले.

Swapnil S

मुंबई : परिपूर्ण समाज घडविण्यासाठी राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधान परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणेही बंधनकारक करण्यात आल्याचे ते म्हणाले.

राज्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे राज्यातील शाळांमध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ लागू करणे. राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात ‘सीबीएसई पॅटर्न’ लागू करण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षापासून ‘सीबीएसई पॅटर्न’ लागू होणार असून राज्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर राज्य सरकारने भर दिला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर राज्यात ‘सीबीएसई पॅटर्न’ लागू करण्यासंदर्भात आढावा घेतल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीने मान्यता दिली असून मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेतील याबाबतच्या प्रश्नावर लेखी उत्तर देत ही माहिती दिली. भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली का? असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता. त्यावर, ‘सीबीएसई’अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार असून १ एप्रिलपासून याची सुरुवात करण्यात येणार असल्याचे उत्तर दादा भुसे यांनी दिले.

Iran War Impact : मध्यपूर्वेतील संघर्षातही देशात LPG पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या जाहीर, पाहा वेळापत्रक

आखाती संघर्षाचा मच्छीमारांना फटका; 'बल्क कन्झ्युमर' वर्गीकरणामुळे संताप; डिझेल दरवाढीने मासेमारी व्यवसाय ठप्प

माथेरान 'मिनी ट्रेन'च्या फेऱ्या घटल्याने पर्यटक नाराज; 'मोटारकार' सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन