मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून कमावले ४५९.५२ कोटी; गेल्या २ वर्षांच्या तुलनेत वाढला महसूल 
महाराष्ट्र

मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून कमावले ४५९.५२ कोटी; गेल्या २ वर्षांच्या तुलनेत वाढला महसूल

मध्य रेल्वेने ‘झिरो स्क्रॅप स्टेटस’ साध्य करण्याच्या निर्धार केला आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून तब्बल ४५९.५२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेने ‘झिरो स्क्रॅप स्टेटस’ साध्य करण्याच्या निर्धार केला आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून तब्बल ४५९.५२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. ही रक्कम आर्थिक वर्ष २०२३-२४ नंतरची सर्वाधिक ठरली आहे.

विविध श्रेणींतील भंगार आणि टाकाऊ साहित्याची विल्हेवाट लावून ही कामगिरी मध्य रेल्वेने साध्य केली आहे. रेल्वे रुळाचे भंगार ४७,५०२ मेट्रिक टन, लोह-धातू भंगार ३१,२९८ मेट्रिक टन, लोह व्यतिरिक्त-धातू भंगार ३,६१६ मेट्रिक टन, स्लीपर्स : २,६५,६२५ नग, रोलिंग स्टॉक ५०, लोकोमोटिव्ह्ज, ७८ डबे आणि १३७ वॅगन्सची विक्री करण्यात आली.

मध्य रेल्वेच्या भांडार विभागाने कुर्ला कटिंग यार्ड, ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप (नाशिक), परळ वर्कशॉप आणि मनमाड वर्कशॉप यांसारख्या दुर्गम व विखुरलेल्या ठिकाणांसह, मध्य रेल्वेच्या सर्व पाचही विभागांमध्ये पडून असलेला भंगार माल शोधून काढण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. यामुळे भंगार विक्री कामगिरीमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

भुसावळची सर्वोत्तम कामगिरी

भुसावळ विभाग हा सर्वाधिक कामगिरी करणारा विभाग म्हणून समोर आला आहे. या विभागाने १०५.३९ कोटी रुपयांच्या भंगार विक्रीची विक्रमी नोंद केली आहे. त्यानंतर माटुंगा कार्यशाळा (६८.३९ कोटी रुपये), नागपूर विभाग (६४.०२ कोटी रुपये), मुंबई विभाग (५५.४९ कोटी रुपये), पुणे विभाग (५० कोटी रुपये) आणि उर्वरित रक्कमेत इतर विभाग व उत्पादन घटकांचा वाटा आहे. मध्य रेल्वेने वापरात नसलेल्या परंतु कार्यरत असलेल्या संसाधनांचा योग्य वापर करण्यावरही लक्ष केंद्रित केले. या संदर्भात, वापरात नसलेले परंतु कार्यरत असलेले एक रोटाटेक प्रिंटिंग मशीन भंगारात टाकण्याऐवजी, ८.७५ कोटी रुपयांच्या मूल्याने नाशिक प्रिंटिंग प्रेसकडे यशस्वीरित्या हस्तांतरित करण्यात आले.

मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी; कोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी, मच्छीमारांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी झेप

भारतीय रेल्वेची पहिली ‘डिजिटल रिफंड’ मोहीम सुरू; १० दिवसांत ६८ टक्के प्रकरणांचा निपटारा, QR कोडमुळे घरबसल्या परतावा

मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पीएचडीचे दालन खुले; PHD अभ्यासक्रमाला विद्या परिषदेची मंजुरी

Mumbai : मालमत्ता कराची विक्रमी वसुली! ७ हजार ६१० कोटी ९० लाख रुपये करसंकलन; एकाच दिवशी ३९९ कोटींची वसुली

Goa Nightclub Fire Update : गोव्यातील नाईटक्लब आग प्रकरण; लुथ्रा बंधूंना जामीन मंजूर, तरीही तुरुंगातच राहावे लागणार