महाराष्ट्र

मध्य रेल्वे २४ विशेष रेल्वे सेवा चालवणार; मुंबई ते नागपूर, पुणे ते नागपूरदरम्यान धावणार

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी रोड तसेच पुणे ते नागपूर आणि एलटीटी ते नागपूर दरम्यान २४ विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी रोड तसेच पुणे ते नागपूर आणि एलटीटी ते नागपूर दरम्यान २४ विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कोल्हापूर आणि सीएसएमटी या गाडीच्या ६ विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक ०१०२९ विशेष गाडी १३, १८ आणि २० फेब्रुवारीला सीएसएमटी येथून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१०३० विशेष गाडी १४, १९ आणि २१ फेब्रुवारीला श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून दुपारी ३.५५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल, तर सीएसएमटी ते सावंतवाडी रोड ते सीएसएमटी या गाडीच्या ६ विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत.

ट्रेन क्रमांक ०११२९ विशेष १४, १९ आणि २१ फेब्रुवारीला सीएसएमटी येथून रात्री १२.२० वाजता सुटेल व सावंतवाडी रोड येथे दुपारी १२.३० वाजता पोहोचेल, तर ट्रेन क्रमांक ०११३० विशेष १४, १९ आणि २१ रोजी सावंतवाडी रोड येथून संध्याकाळी ५.२० वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल.

Mumbai : ८८ बेकऱ्यांना निर्वाणीचा इशारा; BMC ची कठोर कारवाई

Mumbai : सिग्नल यंत्रणेची देखभाल रखडली; नियंत्रकांच्या देखभालीसाठी पालिकेची ११ कोटींची फेरनिविदा

डीजेला कोणत्या आधारे परवानगी दिली जाते? कोर्टाने दाखल केली सुमोटो; आज सुनावणी

नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेला विरोध वाढला; कर्मचारी, अभियंत्यांचा आंदोलनाचा इशारा

Mumbai : मंडळांनी वीज जोडणी करताना खबरदारी घ्यावी; समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन