महाराष्ट्र

किडनी रॅकेटमधील आरोपींना मोक्का; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने सावकारी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याच्या घटनेची व्यापक चौकशी करण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आली आहे. या किडनी विक्री रॅकेटमध्ये गुंतलेल्यांना मोक्का लावण्यासाठी कायद्यातील तरतुदी तपासून घेण्यात येतील, अशी माहिती गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

Swapnil S

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने सावकारी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याच्या घटनेची व्यापक चौकशी करण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आली आहे. या किडनी विक्री रॅकेटमध्ये गुंतलेल्यांना मोक्का लावण्यासाठी कायद्यातील तरतुदी तपासून घेण्यात येतील, अशी माहिती गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याला खासगी सावकारांनी कर्जाच्या विळख्यात ओढून कंबोडियात जाऊन किडनी विकण्यास भाग पाडल्याच्या घटनेप्रकरणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. ही घटना महाराष्ट्रासाठी  लाजिरवाणी आहे. त्यामुळे या रॅकेटमध्ये गुंतलेल्यांना मोक्का लावण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना भोयर म्हणाले, २०२१ ते २०२३ या कालावधीत ही घटना घडली असून २०२५ मध्ये संबंधित शेतकऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरण उजेडात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील घटनेच्या चौकशीत या प्रकरणातील मध्यस्थाच्या माध्यमातून नऊ जणांच्या किडन्या विकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन