Raigad : छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा काढण्याची नामुष्की 
महाराष्ट्र

Raigad : छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा काढण्याची नामुष्की

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पेणमधील चिंचपाडा येथील चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीचे अनावरण आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते पार पडले होते.

Swapnil S

पेण : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पेणमधील चिंचपाडा येथील चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीचे अनावरण आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते पार पडले होते. मात्र अवघ्या २४ तासांत हा पुतळा हटविण्याची नामुष्की पेण नगरपालिका प्रशासनावर ओढावली. या पुतळ्यासाठी सुमारे २२ लाखांचा खर्च केला असल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले होते.

पेण नगरपालिकेने नव्याने बसविलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला होता. मॉडर्न आर्टच्या नावाखाली छत्रपती संभाजी महाराजांचा आपत्तीजनक असल्याचा आरोप शिवप्रेमी संघटनांनी केला होता. हा पुतळा तातडीने हटवून नवीन छत्रपती संभाजी महाराजांचा नवीन पुतळा बसविण्याची मागणी शिवप्रेमी संघटनेने केली होती.

शिवप्रेमी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी राजकीय पक्षाच्या विरोधानंतर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शौर्य, त्याग आणि धर्मनिष्ठेचे प्रतिक मानले जातात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने राज्यकारभार करणाऱ्या सत्ताधारी भाजप नेत्यांनी संभाजी महाराजांचे अत्यंत आक्षेपार्ह शिल्प उभारले होते. आपण जेव्हा स्मारके पुतळे उभे करतो, तेव्हा त्यांनी केलेल्या कार्याची गाथा आणि प्रेरणा मिळावी हा उद्देश असतो.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग