प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर : EVM ठेवलेल्या स्ट्राँग रूमबाहेर पोलिसांचा पहारा; उमेदवारांकडूनही थंडीत LED स्क्रीनद्वारे नजर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील बँडमिंटन हॉलच्या इमारतीत ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. १० पोलीस कर्मचारी २ डिसेंबरपासून स्ट्राँग रूमबाहेर २४ तास आळीपाळीने पहारा देत असून, २१ डिसेंबरपर्यंत हा पहारा असाच कायम राहणार आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील कन्नड येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील बँडमिंटन हॉलच्या इमारतीत ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. १० पोलीस कर्मचारी २ डिसेंबरपासून स्ट्राँग रूमबाहेर २४ तास आळीपाळीने पहारा देत असून, २१ डिसेंबरपर्यंत हा पहारा असाच कायम राहणार आहे.

सार्वत्रिक नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी दोन डिसेंबर रोजी मतदान झाले. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार होता. मात्र न्यायालयाच्या निर्देशानुसार मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत स्थगित झाली आणि प्रशासनाच्या व पोलिसांच्या जबाबदारी अधिकची वाढली आहे.

अचानक मतदानाच्या दिवशी मतमोजणी निर्णय न्यायालयाच्या आदेशाने पुढे ढकल्याने आता ईव्हीएम मशीनच्या बॅटरी टिकतील का? बॅटरी संपल्यावर त्या कधी कोण चार्ज करेल, अशी चर्चा शहरात रंगली आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसह उमेदवारांनी स्ट्राँग रूमबाहेर कडाक्याच्या थंडीत सतत पहारा देणे सुरू केले आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील बॅडमिंटन हॉलच्या इमारतीत ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. या परिसरात १० पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. ८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. उमेदवारासाठी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या हॉल लगत एका हॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. स्ट्रॉग रूमच्या आत आणि बाहेर ८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याचे २४ तास थेट प्रक्षेपण असल्यामुळे आत-बाहेरच्या हालचाली उमेदवारांना व अधिकाऱ्यांना स्पष्टपणे पाहता येत आहेत. स्ट्रॉग रूमच्या गेटला कुलूप लावले असून, कॅमेऱ्याद्वारे त्यावरही सीसीटीव्हीची नजर आहे. पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार आपल्या फौजफाट्यासह पाहणी करत आहेत.

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

Truecaller शिवाय कळणार कोण करतंय फोन? रिंग वाजताच स्क्रीनवर दिसणार नाव; १ नोव्हेंबरपासून नवा नियम

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या २४ विशेष फेऱ्या; १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार

मराठवाड्यात भूजलपातळीत घट; संभाजीनगरात १६९ टँकर सुरू

लग्नाची गोष्ट, पण यावेळी मुलींच्या नजरेतून! 'लग्न आणि बरंच काही' टीमच्या नवशक्तिसोबत खास गप्पा; पूजा म्हणते, 'लग्न करायचं, पण...'