Photo : X (@ShahuChhatrpati)
महाराष्ट्र

शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याला सरन्यायाधीशांचे अभिवादन

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी (दि. १६) कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली. तसेच समाधीस्थळी पुष्प अर्पण करून नतमस्तक होत शाहू महाराजांच्या कार्याचा गौरवही केला.

Swapnil S

कोल्हापूर : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी (दि. १६) कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली. तसेच समाधीस्थळी पुष्प अर्पण करून नतमस्तक होत शाहू महाराजांच्या कार्याचा गौरवही केला.

या वेळी शाहू महाराज छत्रपती, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी नियुक्त न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी शिक्षणाची दारे खुली करून सामाजिक प्रबोधनाचा मार्ग दाखवला. त्यांच्या कार्यातून आजच्या न्यायव्यवस्थेलाही प्रेरणा मिळते.

शाहू महाराजांचे न्यायप्रक्रियेतील योगदान 'सर्वांना समान न्याय' या तत्त्वावर आधारित होते. त्यांचे हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाजसुधारकांना प्रेरणा देणारे ठरले आणि आजही सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात दिशादर्शक आहे. १७ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट भूषण गवई यांच्या हस्ते होणार बेंचचे उद्घाटन सरन्यायाधीश आहे.

Venezuela Earthquake : भीषण भूकंपाने व्हेनेझुएला हादरला! ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; इमर्जन्सी जाहीर

'बँक ऑफ इंडिया'ला १ कोटी डॉलर्स देण्याचे नीरव मोदीला आदेश

भारत-अमेरिका व्यापार करारातील तरतुदींचा आढावा; शुल्क आकारणीतील अडथळे कमी करण्यावर भर

मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Thane : बारवी धरणक्षेत्राला पावसाची प्रतीक्षा; यंदाच्या पावसाळ्यात अवघ्या १७ मिमी पावसाची नोंद