नाना पटोले एएनआय
महाराष्ट्र

परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न - पटोले 

बीड, परभणीतील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र महायुतीचे सरकार या प्रकरणी कारवाईचा बनाव करत आहे.

Swapnil S

मुंबई : बीड, परभणीतील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र महायुतीचे सरकार या प्रकरणी कारवाईचा बनाव करत आहे. या प्रकरणाच्या चौकशीतून काय उत्तर समोर येणार हे जगजाहीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड परभणीतील प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या दोन दिवसांच्या नव सत्याग्रह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बेळगावात पोहचले असताना प्रसार माध्यमांशी बोलत होते. या दोन्ही घटनांवर जनतेने व सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी वस्तुस्थिती मांडली आहे पण भाजपा युती सरकार ते मान्य करत नाही, हे सरकार प्रायोजित असल्याने सीआयडी चौकशी केली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई