Satara : सहावीच्या गणिताने गुरुजींनाही फोडला घाम; अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेच्या पलिकडे  प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Satara : सहावीच्या गणिताने गुरुजींनाही फोडला घाम; अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेच्या पलिकडे

इयत्ता सहावीच्या यंदापासून बदललेल्या गणित अभ्यासक्रमातील काठिण्यपातळी आणि प्रश्नांच्या स्वरूपामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनीही डोक्याला हात लावला आहे.

Swapnil S

कराड : इयत्ता सहावीच्या यंदापासून बदललेल्या गणित अभ्यासक्रमातील काठिण्यपातळी आणि प्रश्नांच्या स्वरूपामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनीही डोक्याला हात लावला आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम बदलला आहे. हा अभ्यासक्रम निवडताना त्यात विद्यार्थ्यांचे वयोमान आणि त्यांच्या आकलन क्षमतेनुसार अभ्यासक्रमाची रचना केली नसल्याचा शिक्षकांचा व पालकांचा आक्षेप आहे.

पाचवीपर्यंतच्या तुलनेने सोपे गणित शिकलेल्या विद्यार्थ्यांना सहावीत गेल्यानंतर मोठमोठी समीकरणे आणि कठीण गणितांचा सामना करावा लागत आहे. त्रिमितीय आकारांचे जाळे, ऑयलरचे सूत्र तसेच गुंतागुंतीची शाब्दिक उदाहरणे देण्यात आली आहेत. विशेषतः सराव संचातील उदाहरणे आणि मूल्यमापनामधील उदाहरणात प्रचंड तफावत आहे. या अभ्यासक्रमाचा पुनर्विचार करून स्तरनिहाय सराव, पूरक पुस्तिका आणि विद्यार्थ्यांना समजेल अशी सुलभ मूल्यमापन पद्धती उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी पालक-शिक्षकांकडून होत आहे.

सामान्यत: विद्यार्थ्यांना गणिताविषयी नावड असते. त्यातच त्याची काठिण्यपातळी वाढवल्यास विद्यार्थ्यांत न्यूनगंड वाढू शकतो. मुलांना अभ्यासक्रमाची गोडी लागावी आणि त्यांनी शिक्षणप्रवाहात टिकून राहावे अशी अभ्यासक्रमाची रचना असायला पाहिजे, अशी मागणीही शिक्षक व पालकांमधून होत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यात दुष्काळामुळे भाजीपाल्याचे दर दुप्पट; पितृपक्षामुळे भाज्यांची मागणी वाढली

Mumbai : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर...CSMT वर ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

Pune : प्रत्यक्षदर्शींना जिवे मारण्याची धमकी; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे

Mumbai : ५ ऑक्टोबरपासून बेस्ट मार्गांत बदल; आठ मार्गांचे वातानुकूलित सेवेत रूपांतर

Mumbai : ...तर पैसे परत घेण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा ग्राहकाला दिलासा, बिल्डरांना झटका