समृद्धी महामार्गालगत CNG पाइपलाईनला गळती; धुळे-सोलापूर महामार्गावर वाहनांचा भार प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गालगत CNG पाइपलाईनला गळती; धुळे-सोलापूर महामार्गावर वाहनांचा भार

वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगाव शिवारात समृद्धी महामार्गालगत गेल कंपनीच्या गॅस पाइपलाईनला शनिवारी गळती लागल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगाव शिवारात समृद्धी महामार्गालगत गेल कंपनीच्या गॅस पाइपलाईनला शनिवारी गळती लागल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक वळविण्यात आल्याने धुळे-सोलापूर महामार्गावर वाहनांचा भार वाढला.

माहिती मिळताच प्रशासन आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. संभाव्य धोका लक्षात घेऊन समृद्धी महामार्गावरील साखळी क्रमांक ४४७ ते ४७० दरम्यानची वाहतूक धुळे-सोलापूर महामार्गावरून वळविण्यात आली.

मुंबईकडून जाणारी वाहने हडस पिंपळगाव इंटरचेंजवरून उतरवून धुळे-सोलापूर महामार्गावरून माळीवाडा येथे पुन्हा समृद्धी महामार्गावर सोडण्यात येत होती. तर नागपूरकडून येणारी वाहने माळीवाडा इंटरचेंजवरून वळवून हडस पिंपळगाव येथून पुन्हा महामार्गावर आणण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पेढा, पनीरसह मिठाईही महागणार; दक्षिण मुंबईत म्हशीचे दूध ११२ रु. लिटर

देशभरात साखरेचे दर चढेच; किरकोळ बाजारात भाव ₹६० च्या पार, केंद्र सरकारने अनेक पावले उचलूनही साखर कडूच

मुंबई पोलिसांच्या घोडदळ पथकासाठी १.२७ कोटींचा निधी मंजूर; ३८ पोलिसांचे पथक तैनात, मुंबई पोलिसांचे बळ वाढणार

Mumbai : वाकोला नदीजवळच संरक्षक जाळ्या बसवणार; पालिका पावणेदोन कोटी खर्च करणार

Mumbai : नारळाच्या झाडांना संरक्षण जाळ्या बसवा! पालिका आयुक्त, उद्यान अधीक्षकांना मकरंद नार्वेकर यांचे पत्र