महाराष्ट्र

काँग्रेसचा महत्त्वपूर्ण निर्णय; विधानसभा निवडणुकीआधी जागा वाटपासाठी समिती जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशानुसार जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी समिती जाहीर केली आहे.

Swapnil S

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशानुसार जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी समिती जाहीर केली आहे. या समितीत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह प्रदेश समितीतील नेत्यांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे. यंदाच्या निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसने समिती जाहीर केली आहे. काँग्रेसने जागा वाटपासाठीच्या वाटाघाटीसाठी नेमलेल्या महाराष्ट्र प्रदेशच्या समितीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री आरिफ नसीम खान, माजी मंत्री सतेज पाटील यांचा समावेश आहे. तर मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीमधून मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री असलम शेख यांचा समावेश आहे. या समितीमध्ये सामाजिक आणि प्रादेशिक समतोल राखण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री