प्रातिनिधिक छायाचित्र 
महाराष्ट्र

'लाडकी बहीण'चे पैसे निवडणुकीनंतरच द्या! काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत रक्कम जमा केल्यास एक कोटीहून अधिक महिला मतदारांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच खात्यात पैसे जमा करावेत, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस अ‍ॅड. संदेश कोंडविलकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत रक्कम बँक खात्यात जमा केल्यास एक कोटीहून अधिक महिला मतदारांवर त्याचा थेट प्रभाव पडू शकतो. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करावेत, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस अ‍ॅड. संदेश कोंडविलकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, महानगरपालिका निवड-णुकांच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ या दोन महिन्यांचे एकत्रित ३,००० रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे एक कोटीहून अधिक महिला मतदार प्रभावित होण्याची

शक्यता असून, निवडणुकीच्या दिवशी सत्तारूढ पक्षाच्या उमेदवा-रांना मतदान करण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते. ही कृती म्हणजे एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच असून, त्यामुळे आदर्श आचारसं-हितेचा भंग होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

लाडकी बहीण योजनेला पक्षाचा विरोध नसल्याचे स्पष्ट करत, डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ या कालावधीतील योजनेची रक्कम निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंत-रच वितरित करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू