Pune : दगडूशेठ हलवाई गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा 
महाराष्ट्र

Pune : दगडूशेठ हलवाई गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने मंगळवारी हा निर्णय जारी केला आहे. तीन वर्षांपूर्वी हे मंदिर ‘क’ वर्ग पर्यटन स्थळांच्या यादीत होते. मात्र, पुण्यातील ऐतिहासिक स्थळांच्या जवळ असणारे हे मंदिर धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन साखळीतील महत्त्वाचा भाग असून ‘अ’ वर्ग स्थळांच्या निकषात बसते. त्यामुळे मंदिराचा ‘अ’वर्ग पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुण्यात १८९३ साली स्थापित झालेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर पुण्याच्या इतिहास, श्रद्धा, संस्कृती आणि समाजसेवेचे प्रतीक आहे. धार्मिक भक्ती, सामाजिक एकोपा, सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन विकास यांचा संगम या स्थळामध्ये आहे. पुणे शहरातील प्रसिद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे असे हे स्थान महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक आणि पर्यटन परंपरेचे प्रतीक बनल्याचे पर्यटन विभागाने आपल्या निर्णयात नमूद केले आहे. या स्थळाचेही पर्यटन विषयक महत्त्व लक्षात घेऊन या आधी २०२३ मध्ये ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला. आता तो अ करण्यात आला आहे.

सोने-चांदी बाजारात मोठी घडामोड? अमेरिकी रोजगार आकडेवारी, इराणमधील तणावाचा परिणाम जाणवणार

Ganeshotsav 2026 : गणपतीला कोकणात जाताय? रेल्वे स्थानकावर शेवटच्या क्षणी धावपळ नको; मध्य रेल्वेने दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

CJP Protest : ५ सप्टेंबरच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; कायद्याचे पालन करण्याचे निर्देश

Nepal Floods : महापुरात गावं वाहून गेली, तरी 'ते' घर तग धरून उभं! काय आहे यामागचं रहस्य?

Delhi Crime : मदतीच्या बहाण्याने बसमध्ये घेतलं अन्...; १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, चालक-कंडक्टर अटकेत