महाराष्ट्र

देश-विदेशातील गुंतवणूकदारांसाठी राज्यात ‘डेस्क’; जागतिक व प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत नवीन गुंतवणूक धोरण

राज्यात देश-विदेशातील गुंतवणूक वाढावी याकरिता गुंतवणूकदारांसाठी 'कंट्री डेस्क' विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच जागतिक व प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत असे नवीन गुंतवणूक धोरण अमलात आणण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात देश-विदेशातील गुंतवणूक वाढावी याकरिता गुंतवणूकदारांसाठी 'कंट्री डेस्क' विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच जागतिक व प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत असे नवीन गुंतवणूक धोरण अमलात आणण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्यात विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.

देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी, गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी, त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी 'कंट्री डेस्क' या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.

तसेच नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. राज्य सरकार व प्रमुख उद्योग गटांमध्ये समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने औद्योगिक समन्वय सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महाराष्ट्रात प्राधान्याने गुंतवणूक व्हावी यासाठी संभाव्य गुंतवणूकदारांसोबत संवाद प्रस्थापित करण्यात येत आहे. याद्वारे गुंतवणुकीच्या दृष्टीने सातत्याने सहकार्य देण्यात येईल. आजपर्यंत झालेल्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी जलद गतीने करण्यात येईल.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींबाबत जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. याअंतर्गत बहुपक्षीय संस्थांशी आणि विकास बँकांशी सहकार्य वाढवणे, दूतावास व व्यापार संघटनांशी समन्वय वाढवणे, महाराष्ट्रातील मराठी प्रवासी समुदायाला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे आणि इलेक्ट्रॉनिक्स, कापड, ऑटोमोबाईल आणि औषधनिर्मिती अशा विविध क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

...असे होणार काम !

गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रस्तावांत मदत करण्यासाठी ‘कंट्री डेस्क’ विशेष कक्ष

जागतिक आणि प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत नवीन गुंतवणूक धोरण

शासन आणि प्रमुख औद्योगिक संस्थांमध्ये समन्वय वाढवणे

संभाव्य गुंतवणूकदारांशी संवादगुंतवणुकीच्या प्रक्रियेत गुंतवणूकदारांना सतत आवश्यक सहाय्य देणे

सामंजस्य कराराचा पाठपुरावा करणे आणि अंमलबजावणीची गती सुधारणे

राज्यातील गुंतवणुकीच्या संधींबद्दल जागरूकता निर्माण करणे

दूतावास आणि व्यापारी संघटनांसोबत समन्वय वाढवणे

बहुपक्षीय संस्था आणि विकास बँकांसोबत काम करणे

विशेषतः देश-विदेशातील महाराष्ट्रीयन उद्योजक यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करणे

इलेक्ट्रॉनिक्स, टेक्सटाईल, ऑटोमोबाईल्स, फार्मास्युटिकल्स यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे

ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी