मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘इंडिगो’ने प्रवास 
महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘इंडिगो’ने प्रवास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी पुण्याहून बंगळुरूला विशेष विमानाऐवजी ‘इंडिगो’च्या नियमित प्रवासी विमानाने रवाना झाले.

Swapnil S

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी पुण्याहून बंगळुरूला विशेष विमानाऐवजी ‘इंडिगो’च्या नियमित प्रवासी विमानाने रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सामान्य जनतेप्रमाणे प्रवास करून आगळा आदर्श घालून दिला.

गुरुवारी विधानभवनापर्यंत आपला नियमित ताफा टाळून त्यांनी बाइकने प्रवास केल्यानंतर, फडणवीस यांनी शुक्रवारीही सामान्य प्रवाशांसोबत विमान प्रवास करत सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन दिले. पुण्यावरून ते ‘आर्ट ऑफ लिव्हींग’च्या एका कार्यक्रमासाठी बंगळुरूकडे इंडिगोच्या सार्वजनिक विमानातून रवाना झाले.

विशेष विमान किंवा सरकारी विमानाऐवजी व्यावसायिक विमान कंपनीच्या नियमित फ्लाइटचा वापर करून त्यांनी पर्यावरणस्नेही, अर्थव्यवस्थेला पूरक आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या वाहतुकीच्या सवयीला प्रोत्साहन दिले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच इंधन बचत करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ शब्दांत नव्हे तर कृतीतून प्रतिसाद दिला आहे.

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा