महाराष्ट्र

बीड : संतोष देशमुखांच्या भावाविरुद्ध गुन्हा

बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात एका वादातून फिर्यादीच्या डोक्याला बंदूक लावल्याप्रकरणी धनंजय देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हत्येचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. मात्र, देशमुख यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे धनंजय हे बंधू आहेत.

Swapnil S

बीड : बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात एका वादातून फिर्यादीच्या डोक्याला बंदूक लावल्याप्रकरणी धनंजय देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हत्येचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. मात्र, देशमुख यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे धनंजय हे बंधू आहेत. संतोष यांच्या खुनाचे प्रकरण गाजले होते. त्यातून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

बीड तालुक्यातील बेलवडी येथील रहिवासी समाधान खिंडकर (३०) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना शनिवारी रात्री एका हॉटेलमध्ये घडली. जेव्हा खिंडकर हा रवीराज साबळे नावाच्या रील-मेकरचा इन्स्टाग्रामवर थेट व्हिडिओ (लाईव्ह) बनवत होता, तेव्हा धनंजय देशमुख याच्या अंगरक्षकाने त्याचा फोन हिसकावून घेतला. फोन का घेतला, असे विचारल्यावर धनंजय देशमुख याने आपल्या अंगरक्षकाचे पिस्तूल काढून ते फिर्यादीच्या डोक्याला लावले आणि त्याच्या कामात ढवळाढवळ न करण्याची धमकी दिली, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी

Mumbai : धक्कादायक! SNDT कॉलेजच्या कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

Thane : 'स्वस्त घर' आणि शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.९७ कोटींची फसवणूक; तिघांविरोधात तक्रार

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण