महाराष्ट्र

'अजिबात घाबरू नका, वडिलांप्रमाणे लढा' देशपातळीवरील 'या' नेत्याचा उद्धव ठाकरेंना सल्ला

छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त षण्मुखानंद सभागृह, मुंबई येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते

प्रतिनिधी

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या मोठ्या राजकीय संकटातून जात आहेत असे म्हणायला हरकत नाही. आमदारांच्या बंडखोरीपासून ते अगदी सत्तेवरून पायउतार होईपर्यंच्या सर्व घटना देशाने बघितल्या. मात्र या सर्व प्रकारांमध्ये महाविकास आघाडीमधील त्यांचे मित्रपक्षातील काही नेत्यांनी त्यांची साथ अजिबात सोडली नाही. छगन भूजबळ हे नाव त्यामध्ये अग्रस्थानी असल्याचे पहिल्यापासून पाहण्यात आले. या सर्वव्यतिरिक्त देशपातळीवरील राज्याबाहेरील नेत्यांनी ही त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

काश्मीरमधील नेत्यांकडून नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी उद्धव ठाकरेंना प्रोत्साहन दिले. फारुख अब्दुल्ला यांनी उद्धव ठाकरेंना वडिलांप्रमाणे लढण्याचा सल्ला दिला आहे.

छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त षण्मुखानंद सभागृह, मुंबई येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला उपस्थित होते. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेही उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि फारुख अब्दुल्ला यांची भेट झाली. त्यावेळी तुम्ही अजिबात घाबरू नका. वडिलांप्रमाणे लढा, असे अब्दुल्ला म्हणाले. 

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...