(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

अशोक खरातचा ED ताबा घेणार; आज PMLA कोर्टात हजर करणार

लैंगिक अत्याचारातील आरोपी भोंदू अशोक खरात आणि पंतसंस्थेतील आर्थिक व्यवहार प्रकरणातील संशयित नामकर्ण आवारे यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. सिन्नर सत्र न्यायालायाकडून दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Krantee V. Kale

नाशिक : लैंगिक अत्याचारातील आरोपी भोंदू अशोक खरात आणि पंतसंस्थेतील आर्थिक व्यवहार प्रकरणातील संशयित नामकर्ण आवारे यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. सिन्नर सत्र न्यायालायाकडून दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दोघांना एकाच वाहनातून न्यायालयात हजर करण्यात आले होते. आवारेंना आधी पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती, पुन्हा आवश्यकता नाही असा युक्तिवाद आवारेच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. अशोक खरात आणि नामकर्ण आवारे या दोघांची पाच दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. अखेर न्यायालयाने दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

याप्रकरणात अशोक खरातची ईडी चौकशी सुरू असल्याने ईडीने अशोक खरातचा ताबा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, त्यामुळे खरातला ईडीकडून ताब्यात घेतले जाईल. ईडीकडून कोर्टाकडे तसा अर्ज करण्यात आल्याची माहिती आहे. नाशिक पोलिसांकडून अशोक खरातला ताब्यात घेण्यासाठी ईडीची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली असून आजच (मंगळवारी, दि.१९) ताबा घेऊ शकते अशी माहिती मिळत आहे. त्यानंतर ईडीचं पथक त्याला मुंबईतील PMLA कोर्टात हजर करेल. मनी लॉण्डरिंग आणि बनावट बँक खात्यांद्वारे आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीनं त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि उत्पन्न करपात्र होऊ नये, यासाठी बँकिंग नियमातील दोन लाख मर्यादेची पळवाट देखील खरातने शोधल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे. महिला लैंगिक अत्याचार आणि अन्य प्रकरणात खरात गेल्या दोन महिन्यांपासून कारावासात आहे. विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्याची चौकशी सुरु आहे. प्राप्त माहितीनुसार, खरातला पोलिसांकडून अटकेची चाहूल लागली होती. अटक टाळण्यासाठी त्याने कोपरगाव येथील समता पतसंस्थेत ६५ बनावट खाती उघडून केवळ चार दिवसात २०० हून अधिक व्यवहारांद्वारे ५२ कोटी रुपये काढले. या रकमेसह त्याचा परदेशात पलायनाचा प्लान होता. पतसंस्थेतील बनावट खात्यांमध्ये चाकणकर भागीनिंसह महसूल आणि आरटीओ विभागांतील प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांच्या तसेच अनेक प्रतिष्ठित कुटुंबातील सदस्यांच्या नावेही खाती असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

बेनामी खात्यांतून ५२ कोटी काढून भोंदू अशोक खरातचा स्वतःचा बचाव करण्यासाठी न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियात पळून जाण्याचा प्लान होता. त्यासाठीच अटकेपूर्वी बनावट खात्यांमधून त्याने संशयास्पद व्यवहार केल्याची माहिती चौकशीमध्ये समोर आली आहे. पोलिसांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खरातने न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियात पळून जाण्याची जय्यत तयारी केली होती. परदेशात अनेकांशी संबंध असल्याने तिथे स्थायिक होऊन पोलिसांच्या हातावर तुरी देण्याचा त्याचा प्रयत्न होता.

दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कॉकरोच जनता पार्टीचे 'एक्स' अकाउंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश

Mumbai : धरणक्षेत्रात पाऊसधारा; २४ तासांत पाणीसाठ्यात ३.७३ टक्क्यांनी वाढ

Kasara Ghat Landslide : जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, Video

उरण : जेएनपीए बंदरात वादळी वाऱ्याचा तडाखा; कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू

मुसळधार पावसानंतर ठाण्यात अस्वच्छतेचे साम्राज्य; झाडांच्या फांद्या अद्याप रस्त्यांवर, नागरिकांकडून तातडीने साफसफाईची मागणी