मतदार तपासणी मोहिमेला मुदतवाढ प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

मतदार तपासणी मोहिमेला मुदतवाढ

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेला १० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता ही मोहीम २९ जुलैऐवजी ८ ऑगस्ट रोजी पूर्ण होणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.

Swapnil S

मुंबई : निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेला १० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता ही मोहीम २९ जुलैऐवजी ८ ऑगस्ट रोजी पूर्ण होणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.

निवडणूक प्राधिकरणाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राज्यातील प्रारूप (ड्राफ्ट) मतदार याद्या आता पूर्वीच्या ५ ऑगस्टऐवजी १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केल्या जातील. या प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर हा कालावधी देण्यात आला आहे. या दाव्यांचे आणि हरकतींचे निवारण १५ ऑक्टोबरपर्यंत केले जाईल, तर अंतिम मतदार यादी १९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

राज्यात ३० जूनपासून सुरू झालेली ही मोहीम निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या अद्ययावत आणि सत्यापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. महाराष्ट्रातील काही भागांत झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर ही मुदत वाढवून देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू