महाराष्ट्र

निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला दिलासा ; उत्तर देण्यासाठी दिली ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना उद्यापर्यंत (१७ ऑगस्ट गुरुवार) उत्तर सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली होती.

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेत भाजप प्रणित राज्य सरकारमध्ये मंत्रिपदाची शपत घेतली. यानंतर अजित पवार गटाकडून आम्हीचं खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा केला गेला. तसंच आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी नाव आणि घड्याळ या चिन्हावर निवडणुक लढवणार असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं. यामुळे राष्ट्रवादी कोणाची या निर्णय निवडणुक आयोगाकडे गेला. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट उद्या निवडणूक आयोगाला उत्तर सादर करणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार गटाने आपलं उत्तर देण्यासाठी आयोगाकडे चार आठवड्याचा वेळ मागितला आहे. आता निवडणूक आयोगाने ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

अजित पवार गटाने कोणती कागदपत्रे सादर सादर केली आहेत. त्यांची यादी द्या. म्हणजे त्यावर आम्ही उत्तर देऊ असा मेल शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला केला होता. पण आयोगामार्फत त्याला कुठलंही उत्तर आलं नव्हतं. त्यानंतर आता शरद पवार गटाने चार आठवड्यांचा वेळ मागून घेतला होता. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला उत्तर देण्यासाठी ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने शरद पवार गटाला दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना उद्यापर्यंत (१७ ऑगस्ट गुरुवार) उत्तर सादर करण्याची मुदतवाढ दिली होती.

Kalyan-Dombivli : पाणी जपून वापरा! उद्यापासून २१ जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने २४ तास पाणीपुरवठा बंद; KDMC कडून वेळापत्रक जाहीर

अभय योजनेला सरकार मुदतवाढ देणार; सिंधी निर्वासितांच्या मालमत्तांसाठीचे ८५% अर्ज प्रलंबित

३७० रुपयांच्या बिर्याणीवरून सुरू झालेला वाद देशभरात गाजला; नेमकं काय आहे प्रणित मोरे प्रकरण?

Thane : पालिकेची प्रशासकीय घडी विस्कटणार? वर्षअखेरीस अनुभवी वरिष्ठ अधिकारी निवृत्त होणार

Thane : 'रस्त्यावर थुंकू नका' म्हटल्याचा राग; परप्रांतीय कॅबचालकाकडून वृद्धाला जबर मारहाण, संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल