महाराष्ट्र

फडणवीस-जरांगे येणार एकाच व्यासपीठावर?

मंगळवेढा येथे २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला दोघेही एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Swapnil S

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवेढा येथे २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला दोघेही एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या सोहळ्याचे आयोजन भाजप आमदार समाधान अवताडे (पंढरपूर-मंगळवेढा) यांनी केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनाही या कार्यक्रमासाठी अधिकृत निमंत्रण दिले असून, तेही उपस्थित राहणार आहेत. मात्र, जरांगेंनी कार्यक्रमास येण्यास होकार दिला का, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

...तर मोठी घडामोड ठरणार

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून गेल्या काही महिन्यांत जरांगे-पाटलांच्या नेतृत्वात राज्यात तीव्र आंदोलन झाले. त्यांनी अनेकदा फडणवीस यांच्याविरोधातही वक्तव्ये केली. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. या पार्श्वभूमीवर हा सोहळा महत्त्वाचा मानला जात आहे. आता या कार्यक्रमाला जरांगे-पाटील येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जरांगे या कार्यक्रमाला आले, तर ही मोठी घडामोड ठरेल.

आजचे राशिभविष्य, २६ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "हातावर वेदना...

ऐन दिवाळीत मुलाचा अपघाती मृत्यू; पण पालकांचा उदात्त निर्णय; सत्यम दुबे ठरला वसईतील सर्वात तरुण अवयवदाता!

बापच बनला हैवान! बुलढाण्यात जुळ्या मुलींची पित्याने केली हत्या, पत्नीचा राग चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : आरोपी प्रशांत बनकरला ४ दिवसांची पोलिस कोठडी