महाराष्ट्र

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी फलटण सज्ज; वीज व पालखी तळावरील सुविधांची जय्यत तयारी

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे १७ जुलै रोजी फलटण येथे आगमन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषद वारकरी व भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीकरी, वारकरी आणि भाविकांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, वीज आणि पालखी तळावरील व्यवस्थेची व्यापक तयारी करण्यात आली आहे.

Swapnil S

कराड : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे १७ जुलै रोजी फलटण येथे आगमन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषद वारकरी व भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीकरी, वारकरी आणि भाविकांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, वीज आणि पालखी तळावरील व्यवस्थेची व्यापक तयारी करण्यात आली आहे.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले की, जिंती नाका ते विमानतळ मैदान या पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली असून संपूर्ण मार्गाची स्वच्छता आणि आकर्षक एलईडी पथदिव्यांची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्याचे कामही सुरू आहे.

महावितरणकडून वीज वाहिन्यांची देखभाल, झाडांची छाटणी, ट्रान्सफॉर्मर आणि वीज खांबांची सुरक्षा तसेच अखंडित वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र जनरेटर, विद्युत टॉवर आणि सॅटेलाइट पॉइंटची उभारणी सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती व काँक्रीटीकरण अंतिम टप्प्यात असून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिसांकडून स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार करण्यात येत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

एसआयटी चौकशी; MPSC परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा, विद्यार्थ्यांसोबत केली ‘परीक्षा पे चर्चा’

MPSC Exam Postponed : हिवाळी अधिवेशनाचा ‘अडथळा’; गट-क परीक्षा पुढे

६२५ जण मंत्रालयातून ‘बाहेर’; ओएसडी ते शिपाई आपापल्या मूळ विभागात परत

Mumbai : रात्रीस ‘बेस्ट’ चाले... ; गणेश भक्तांसाठी रात्रभर ‘बेस्ट सेवा’

वीज कंपन्यांचे खासगीकरण नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस