प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

चांदूर रेल्वे येथील सेंट्रल बँकेच्या शाखेला आग पैशांसह साहित्य जळून खाक

चांदूर : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील सेंट्रल बँकेत कामकाज सुरू असतानाच दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागून त्यामध्ये बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक झाल्याचे वृत्त आहे.

Swapnil S

चांदूर : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील सेंट्रल बँकेत कामकाज सुरू असतानाच दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागून त्यामध्ये बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. कामकाज सुरू असतानाचा आग लागल्याने कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनी जीव मुठीत धरून बाहेर धूम ठोकली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.

सेंट्रल बँकेची चांदुर रेल्वे शाखा शनिवारी कामकाज सुरु असताना आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत संपूर्ण बँक जळून खाक झाली आहे. बँकेत असलेली रोखही याबरोबर जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे. अग्निशामक दल या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू, आग आटोक्यात येण्यात अडचणी निर्माण झाल्याने धामणगाव आणि तिवसा येथूनही अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले.

बँकेला आग लागल्याचे समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.

Mumbai : मूर्ती कोसळून २ ठार; भुलेश्वरमध्ये गणेश आगमन सोहळ्यातील दुर्घटना

पवारांची तिरकी चाल! मित्रपक्ष घायाळ!

आजचे राशिभविष्य, २४ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सतत बसून काम केल्याने कंबरदुखीचा त्रास? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

Shravan Special : बाजारातील मिठाई नको, फुटाण्यांपासून घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पेढे; रेसिपी अगदी सोपी