महाराष्ट्र

Nashik : भाजपच्या माजी नगरसेवकाला सागर जाधव गोळीबार प्रकरणात अटक

नाशिकच्या पंचवटीतील फुलेनगर येथे तीन दिवसांपूर्वी झालेल्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई झाली असून भाजपाचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पोलिसांनी जुन्या वादातून अटक केली आहे.

Swapnil S

नाशिक : शहराच्या पंचवटीतील फुलेनगर भागात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात भाजपाचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासात निष्पन्न झाले आहे की, जुन्या वादातून सागर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता आणि त्यात पाटील यांचा सहभाग होता.

विशेष म्हणजे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये उपस्थित असतानाच ही अटकेची कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

गोळीबारामागील नेमके कारण आणि इतर संबंधित व्यक्तींचा शोधही सुरु आहे. याआधीच या प्रकरणात ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रकरणाचा तपशीलगेल्या आठवड्यात पंचवटीतील फुलेनगर परिसरात सागर जाधव नावाच्या तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत सागर गंभीर जखमी झाला असून त्याला दोन गोळ्या लागल्या होत्या. पोलिसांनी तपास करत भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वीच राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनाही अटक करण्यात आली होती. त्यामुळे आता भाजपचा दुसरा माजी नगरसेवक गोळीबार प्रकरणात अडकल्याने शहरभर चर्चा सुरू आहे.

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय

Mumbai : प्रवासी दोन लाख, पैसे मात्र ३० लाखांच्या हिशेबाने; 'चलो ॲप'च्या व्यवहारांच्या चौकशीची मागणी

Philippines Plane Crash : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाच्या दोन विमानांची धडक; चार वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, Video

Mumbai : 'बेस्ट कॅन्टीन', 'इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस'चे परवाने निलंबित

Tiger Shroff Firing : हल्लेखोरांची 'झंगी', 'सिग्नल' ॲप्सद्वारे बातचीत