महाराष्ट्र

गुंड गजा मारणेला अटक; केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यकर्त्याला मारहाण

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह त्याच्या टोळीविरोधात मोकोकान्वये कार‌वाई करण्यात आली आहे.

Swapnil S

पुणे : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह त्याच्या टोळीविरोधात मोकोकान्वये कार‌वाई करण्यात आली आहे. गजा मारणे याच्यासह अन्य तीन गुंडांनाही अटक करण्यात आली असून चौथा आरोपी फरार आहे.

आयटी अभियंते देवेंद्र जोग यांना १९ फेब्रुवारी रोजी मारहाण करण्यात आली होती. त्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी मारणे टोळीतील तीन गुंडांना अटक केली आहे. ओम तीर्थराम (३५), किरण कोंडिबा पडवळ (३१) आणि अमोल विनायक तापकीर (३५, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौथा आरोपी श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार हा पसार झाला आहे. त्यांच्याविरोधात यापूर्वी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

या मारहाणीवेळी स्वत: गजा मारणे जरी घटनास्थळी नसला तरी टोळीचा म्होरक्या म्हणून म्हणून तो रडारवर आला. मारहाण प्रकरणात मारणे यालाही आरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली असून, आरोपींसह या गुन्ह्यासंदर्भात ७४ घरांची झडती घेतली आहे. मोबाइल ट्रॅकिंग, सीसीटीव्ही कॅमेरे यांच्याद्वारेदेखील तपास सुरू असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

गाडीचा धक्का लागल्यावरून मारहाण

देवेंद्र जोग हे आयटी अभियंता असून भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांना मारहाण झाल्यावर कोथरूड पोलिसांनी सुरुवातीला मारहाणीची कलमे दाखल केली होती. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यावर त्यामध्ये आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले. जोग हे १९ फेब्रुवारी रोजी घरी जाताना रस्त्यावर गर्दी असल्याने ते बाजूला थांबले होते. त्यावेळी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून चौघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली. त्याबाबत त्यांनी वडिलांसोबत कोथरूड पोलीस ठाण्यात जात फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा आहेत? घरबसल्या ५ सोप्या पद्धतींनी तपासा बॅलन्स; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

Mumbai: अंधेरीत BEST बसचा भीषण अपघात! ब्रेक फेल झाल्याचा चालकाचा दावा; १४ वाहनांना धडक, VIDEO

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना धक्का; १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Lonavala-Karjat Landslide : मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम; १७ जुलैपर्यंत अनेक गाड्या रद्द, वाचा संपूर्ण यादी

Instagram Muse Image : तुमचं अकाउंट Public आहे? मग सावधान! मेटाचं AI फीचर वापरू शकतं तुमचे फोटो; 'असं' करा Opt Out