महाराष्ट्र

"मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या", मनोज जरांगे मागणीवर ठाम, उपोषण सुरुच!

Rakesh Mali

मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने जीआर काढला आहे. शिवसेना नेत अर्जून खोतकर मनोज जरांगे यांच्या भेटीला हा जीआर गेले. मात्र, मनोज जरांगे हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. त्यांनी राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अद्यापही मनोज जरांगे यांचं अमरण उपोषण सुरुचं राहणार असल्याचं जरांगे म्हणाले.

महाराष्ट्र सरकार जोवर जीआरमध्ये सुधारणा करत नाही, तोवर उपोषण सुरुचं राहील. महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय द्या. जीआरमध्ये सुधारणा करायच्या असतील तर मुंबईला शिष्टमंडळ जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. मला चालता येत नसल्याने मी मुंबईला जाणार नाही. माझे शिष्टमंडळ जाईल. अर्जून खोतकर यांनी जीआरमध्ये सुधारणा झाल्यावर पाण्याचा ग्लास घेऊन यावं, असं देखील जरांगे पाटील म्हणाले.

मराठा समाजाकडे जर वंशावळीचे पुरावे असते तर तहसील किंवा उपविभागीय कार्यालयातून कुणबी मराठा जात प्रमाणपत्र मिळालं असतं. राज्य सरकारला त्यासाठी जीआर काढण्याची गरज पडली नसती. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची आमची प्रमुख मागणी आहे. राज्य शासनाने काल घेतलेल्या निर्णयाचं आम्ही कौतूक करत आहोत. मात्र, आमच्या वंशावळी नसल्याने त्याचा एक टक्काही फायदा होणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

राज्य शासनाने एक पाऊल पुढे येऊन या निर्णयातून वंशावळी शब्द काढून सरसकट असा शब्द प्रयोग करुन अध्यादेश काढावा. ही सुधारणा होईपर्यंत आमचं आंदोलन शांततेत सुरु राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग