महाराष्ट्र

राज्यात आरोग्यदायी योजनांचा शुभारंभ; कॅन्सर प्रतिबंधासाठी मुलांचे लसीकरण; सहा जिल्ह्यांत डायलिसिस युनिट सुरू

कॅन्सरवर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत.

Swapnil S

मुंबई : कॅन्सरवर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. आरोग्य विभागाचा उपक्रम सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी ९ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तसेच ६ जिल्ह्यातील ६ आरोग्य संस्थांमध्ये डायलिसिस युनिट सुरू करण्यात येणार आहे.

राज्यातील १३ कोटी जनतेसाठी आरोग्य योजनांचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. राज्यातील जनतेपर्यंत आरोग्य योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असून आरोग्य योजनांपासून कोणी वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच नागरिकांनी आपल्या निरोगी आरोग्य राखण्यासाठी स्वतःला वेळ द्यावा व नियमित व्यायाम करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या सदस्या मनिषा कायंदे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवाचे आयुक्त व मुंबई राष्ट्रीय अभियानाचे संचालक अमगोथ श्री रंगा नायक, राज्य कामगार विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुंबई आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्यासह राज्यातील विविध आरोग्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

UPI तिकीट, पास खरेदीवर प्रवाशांना भुर्दंड; ५.९० रुपये अधिक मोजावे लागणार

समृद्धी ते पुणे ६ तासांच्या पाठलागाचा थरार; १.१३ कोटींचा गुटखा जप्त

Mumbai : आदित्य ठाकरेंना ५०० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस; 'मातोश्री' बाहेर हायव्होल्टेज ड्रामा

१९६५ च्या भारत-पाक युद्धाचे हिरो ए. टी. कूक यांचे निधन

Mumbai : मेट्रोच्या कामादरम्यान दुचाकीवर बॅरिकेड कोसळले; विक्रोळीत प्लंबरचा मृत्यू