इगतपुरी बोगद्यात अपघात; दोघांचा मृत्यू 
महाराष्ट्र

इगतपुरी बोगद्यात अपघात; दोघांचा मृत्यू

शेगाव देवदर्शनासाठी निघालेल्या कर्जत तालुक्यातील भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावरील इगतपुरीजवळील बोगद्यात बस दुभाजकाला धडकून अपघातग्रस्त झाली, यात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Swapnil S

कर्जत : शेगाव देवदर्शनासाठी निघालेल्या कर्जत तालुक्यातील भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावरील इगतपुरीजवळील बोगद्यात बस दुभाजकाला धडकून अपघातग्रस्त झाली, यात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवार, पहाटे सातच्या सुमारास झाला.

कुशीवली गावचा चालक दत्ता ढाकवळ (२६) याचा जागीच मृत्यू झाला, तर सुरेश गौरू लाड (६२) या भाविकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर भाविकांना दुखापती झाल्या असून त्यांच्यावर इगतपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला? राहुल गांधींचे अमित शहांना पत्र; पॅलेट गनबाबत विचारले तिखट प्रश्न

हा 'भाजप विरुद्ध भारत' असा संघर्ष; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, मुंबईत तरुणाईचा विजयी जल्लोष

परीक्षा सुधारणांसाठी टास्क फोर्सची स्थापना; नंदन निलेकणी यांच्याकडे नेतृत्व; पंतप्रधानांची घोषणा

दिल्लीत जाण्याच्या चर्चा फडणवीसांनी फेटाळल्या

जि.प. निवडणुकांबाबत आज सर्वोच्च सुनावणी