अमिताभ गुप्ता  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

अमिताभ गुप्ता यांची एसीबीकडून चौकशी

पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) एसीबीकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Swapnil S

पुणे : पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) एसीबीकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील माहिती अधिकारी सुधीर आल्हाट यांच्या तक्रारीनंतर आणि आरोपानंतर एसीबीकडून कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

पुण्यातील ॲमनोरा टॉवरमध्ये अमिताभ गुप्ता यांचा आलिशान व्हिला आणि मुंबईतील सांताक्रुझमध्येही गुप्ता यांचा पंचतारांकित फ्लॅट असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. माहिती अधिकारी आल्हाट यांच्या तक्रारींमध्ये प्राथमिक चौकशीमध्ये तथ्य आढळल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे अमिताभ गुप्ता यांच्या खुल्या चौकशीसाठी अर्ज करून परवानगी मागितली आहे.

मुळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या अमिताभ गुप्ता यांचा पुण्यात व्हिला तर मुंबईत फाईव्हस्टार फ्लॅट असल्याची माहिती मिळत आहे. अमिताभ गुप्ता हे १९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कोरोना काळात पुणे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. त्याचवेळी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय आणि ईडीच्या रडारवर असलेल्या वाधवान कुटुंबाला लॉकडाऊन काळात महाबळेश्वरला जाण्यासाठी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी आपल्या सही आणि शिक्क्याचे एक पत्र दिले होते. त्यामुळे ते प्रचंड वादात सापडले होते.

Mumbai : ‘क्लस्टर’अंतर्गत नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला मोठे यश; अमेरिकेच्या अहवालात दावा, सरकार आक्षेप नोंदविणार का? काँग्रेसचा सवाल

नवी मुंबई : शिवछत्रपती स्मारकाचे आज अधिकृत अनावरण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

दिशा सालियन मृत्यू प्रकरण : SIT चा रिपोर्ट दंडाधिकारी न्यायालयात दाखल का केला नाही? - हायकोर्ट

नवी मुंबई : शिवस्मारक अनावरणप्रकरणी पोलिसांची नोटीस स्वीकारण्यास अमित ठाकरेंचा नकार