१००० अंगणवाड्यांना 'केळीच्या आकाराचे' बाक; जळगाव जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम 
महाराष्ट्र

१००० अंगणवाड्यांना 'केळीच्या आकाराचे' बाक; जळगाव जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

अंगणवाड्यांमधील वातावरण अधिक आकर्षक, आनंददायी आणि बालमैत्रीपूर्ण करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेने अभिनव पाऊल उचलले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सुमारे १००० अंगणवाड्यांना केळीच्या आकाराचे रंगीत बाक (Banana Shaped Benches) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

Swapnil S

जळगाव : अंगणवाड्यांमधील वातावरण अधिक आकर्षक, आनंददायी आणि बालमैत्रीपूर्ण करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेने अभिनव पाऊल उचलले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सुमारे १००० अंगणवाड्यांना केळीच्या आकाराचे रंगीत बाक (Banana Shaped Benches) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

१००० अंगणवाड्यांना 'केळीच्या आकाराचे' बाक

या देखण्या आणि आकर्षक बाकांमुळे अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांना खेळता खेळता शिकण्याचा आनंद मिळणार आहे. केळीच्या आकाराचे रंगीत डेस्क मुलांचे लक्ष वेधून घेत असून त्यांच्यात शिकण्याची आवड निर्माण करण्यास मदत होणार आहे. तसेच बसण्याची सुरक्षित आणि सुटसुटीत व्यवस्था उपलब्ध होणार असल्याने वर्गातील वातावरण अधिक सुसज्ज होईल.

१००० अंगणवाड्यांना 'केळीच्या आकाराचे' बाक

या उपक्रमामुळे अंगणवाड्यांमधील पारंपरिक आणि काहीसे निरस शैक्षणिक वातावरण बदलून ते अधिक आनंददायी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढाकारातून १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून हा उपक्रम राबविण्यात येत असून अंगणवाड्यांच्या भौतिक सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे.

या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पालकांकडून स्वागत होत असून जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची अंमलबजावणी पुढेही सुरू राहील.
मीनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी

Mumbai : मालमत्ता पुनर्विकासासाठी नवे धोरण; वाढीव FSI वर प्रीमियम आकारणार, BMC च्या तिजोरीत कोट्यवधीची भर पडणार

Mumbai : सीसी रस्त्यांसाठी आणखी ६,६०० कोटी; तिसऱ्या टप्प्यात ३११ किमीचे रस्ते होणार सीसी

देशात सर्वात कोरडा मान्सून; एल-निनोचा फटका; सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

यशोमती ठाकूर यांची चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका

विशाखा राऊत यांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा; जागा रिक्त ठेवण्याचे निर्देश