Jalgaon : जामनेर-बोदवड मार्गावरील अपघातात ६ ठार; मालदाभाडीजवळ ट्रकची दुचाकीला धडक, मृतांमध्ये ३ बालकांचा समावेश 
महाराष्ट्र

Jalgaon : जामनेर-बोदवड मार्गावरील अपघातात ६ ठार; मालदाभाडीजवळ ट्रकची दुचाकीला धडक, मृतांमध्ये ३ बालकांचा समावेश

सर्व मृत मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील मालची तांडा येथील रहिवासी असून, ते शेतमजूर असल्याची माहिती आहे.

Swapnil S

जळगाव : जामनेर-बोदवड रस्त्यावरील मालदाभाडी फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश असून, तीन महिन्यांच्या बाळाचाही मृत्यू झाला.

सर्व मृत मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील मालची तांडा येथील रहिवासी असून, ते शेतमजूर असल्याची माहिती आहे. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मालदाभाडी फाट्याजवळील पेट्रोल पंपानजीक हा अपघात घडला.

पल्सर दुचाकी (क्र. एमपी ६८ झेडएफ ३३४०) बोदवडकडून येत असताना जामनेरकडून जाणाऱ्या ट्रकची (क्र. एचआर ५५ एके ५२३२) तिला धडक बसली.

या दुर्घटनेत दुचाकीवरील सहाही जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये रामा सुरशिंग भिलाले (२६), शिमला रामा भिलाले (२२), पुज्या रामा भिलाले (५), भरती रामा भिलाले (३), श्रवण रामा भिलाले (तीन महिने) आणि चंपालाल रेवणशिंग भिलाले (२८) यांचा समावेश आहे.

अपघातस्थळाजवळील एचपी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवले आहे. ट्रक आणि चालकाला पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मसाल्यात भेसळ केल्यास ७ वर्षे शिक्षा, १० लाख दंड; FDA ची नवी नियमावली जारी

रायगड जिल्ह्यात भात पीक संकटात; लागवडीचे क्षेत्र घटले, दरवाढीची चिन्हे

दिवाळीत एसटी प्रवाशांना दिलासा; १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द

CJP Protest : झुरळे आज पुन्हा रस्त्यावर; मार्च रोखण्यास न्यायालयाचा नकार, तर पालिकेचा खोडा

१ नोव्हेंबरपासून फोन करणाऱ्याचे नाव दिसणार; दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय