महाराष्ट्र

जळगाव महापालिकेत १२ उमेदवार बिनविरोध; आता ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार निवडणूक रिंगणात

जळगाव महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. अखेर ७५ जागांपैकी १२ जागा बिनविरोध निघाल्या असून, यामध्ये दोन आमदार पुत्रांचा समावेश आहे. एकूण ३१७ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Swapnil S

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. अखेर ७५ जागांपैकी १२ जागा बिनविरोध निघाल्या असून, यामध्ये दोन आमदार पुत्रांचा समावेश आहे. एकूण ३१७ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. माघारीनंतरही निवडणूक रंगतदार ठरणार असून आता ३२१ उमेदवार ६३ जागांसाठी आपले नशीब आजमावणार आहेत.

अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी शिवसेना (ठाकरे गट) चे ४, राष्ट्रवादी व इतर पक्षांचे ५ आणि अपक्ष ३०१ असे एकूण ३१० उमेदवारांनी माघार घेतली. याआधीच्या दोन दिवसांत ७उमेदवारांनी माघार घेतल्याने एकूण माघार घेणाऱ्यांची संख्या ३१७झाली आहे.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला मनोज काळे, अंकिता पंकज पाटील, विशाल सुरेश भोळे, वैशाली अमित पाटील, विश्वनाथ सुरेश खडके, सागर शामकांत सोनवणे, रेखा चुडामण पाटील, गणेश सोनवणे, गौरव चंद्रकांत सोनवणे, विरेन खडके.

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Ahmedabad : चनिया चोली घालून महिला पोलिसांचा गरबा; स्त्रियांच्या सुरक्षेसाठी 'तिच्या टीम'ची अनोखी शक्कल

Nalasopara Fire : नालासोपाऱ्यात १४ मजली इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, २५ रहिवाशांची सुटका, VIDEO

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील टिप्पणीप्रकरणी राहुल गांधी यांच्यावरील खटल्याला स्थगिती