जव्हार : चहा महागला, केळीला पसंती 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

जव्हार : चहा महागला, केळीला पसंती

जव्हार शहरात शाळा, महाविद्यालये तसेच आयटीआय असल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी येतात. चहासोबत बिस्किट, टोस्ट, पाव, ब्रेड आदी पदार्थ घेतल्याने खर्चात आणखी भर पडते. त्यामुळे चहाच्या वाढलेल्या किमतीचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असून, त्यांनीही फळांकडे मोर्चा वळवला आहे.

Swapnil S

जव्हार : प्रशासकीय केंद्र असल्याने जव्हार शहरात तालुक्यातील ४८ ग्रामपंचायती तसेच दोन ग्रामदान मंडळांमधील नागरिक विविध शासकीय व खासगी कामांसाठी नियमित येत असतात. बाजारपेठ, दवाखाने, बँका आदी कामे आटोपल्यानंतर चहाचा आस्वाद घेणे हा अनेकांचा नेहमीचा दिनक्रम आहे. मात्र, साखरेच्या दरवाढीमुळे चहाच्या किमतीत वाढ झाल्याने नागरिकांनी आता चहाऐवजी केळीला पसंती देण्यास सुरुवात केली आहे.

जव्हार शहरात शाळा, महाविद्यालये तसेच आयटीआय असल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी येतात. चहासोबत बिस्किट, टोस्ट, पाव, ब्रेड आदी पदार्थ घेतल्याने खर्चात आणखी भर पडते. त्यामुळे चहाच्या वाढलेल्या किमतीचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असून, त्यांनीही फळांकडे मोर्चा वळवला आहे. केळी तुलनेने स्वस्त असून पोटभरण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांकडून केळीला अधिक पसंती मिळत आहे.

जव्हारच्या बाजारपेठेत केळीच्या मागणीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. कमी खर्चात भूक भागविणारा पर्याय म्हणून केळी नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे. साखरेच्या दरवाढीचा परिणाम केवळ चहाच्या किमतीवरच नव्हे, तर ग्राहकांच्या पसंतीवर आणि दैनंदिन खाण्याच्या सवयींवरही होत असल्याचे या बदलातून दिसून येत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : रक्षाबंधनानिमित्त BEST च्या १३६ अतिरिक्त बसेस

Mira Bhayandar : महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेतून मराठी गायब; नावांच्या चुकीने परिवहन सभापती अडचणीत

Mumbai : रेल्वे कॅटरिंग कर्मचाऱ्यांसाठी गणवेश अनिवार्य; मुंबई विभागातील रेल्वे स्टॉल्ससाठी सुधारित नियमावली लागू; पश्चिम रेल्वेचा निर्णय

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाला वेग! 'तुळशी'ने ९ मीटर बोगदा खणला

Mumbai : सात दिवसांत कोट्यवधी रुपयांची थकीत रक्कम भरा; अन्यथा जप्त मालमत्तांचा लिलाव- पालिकेचा इशारा