महाराष्ट्र

जय पवार यांचा साखरपुडा, आत्या सुप्रिया सुळेंनी फोटो शेअर करीत केली खास पोस्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा ऋतुजा पाटील यांच्याशी पुण्यात गुरुवारी साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Krantee V. Kale

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा ऋतुजा पाटील यांच्याशी पुण्यात गुरुवारी साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

पुण्याच्या घोटावडे येथील अजित पवार यांच्या फार्महाऊसवर, कुटुंबीय व काही जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा साखरपुडा पार पडला. सोहळ्याला फक्त विशेष आमंत्रितांनाच बोलवण्यात आलं होतं.

कोण आहे ऋतुजा पाटील?

फलटणचे प्रवीण पाटील उद्योजक असून ते सोशल मीडिया कंपनी सांभातात. ऋतुजा ही त्यांची कन्या आहे. ऋतुजा उच्चशिक्षित आहे. जय आणि ऋतुजा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दुसरीकडे अजित पवारांचे धाकटे पुत्र जय यांचा उद्योग व्यवसायाकडे जास्त कल असला तरी गेल्या काही वर्षांपासून तेही राजकारणात सध्या सक्रिय होत असल्याचे दिसते आहे.

आत्या सुप्रिया सुळेंनी शेअर केले फोटो

साखरपुड्याच्या कार्यक्रमानंतर जय पवारांच्या आत्या अर्थात सुप्रिया सुळे यांनी साखरपुड्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले, त्यासोबत एक पोस्ट देखील लिहिली.

"आमच्या जयसाठी खूप आनंदी आहे...ऋतुजा तुझे (कुटुंबामध्ये) हार्दिक स्वागत. तुम्हा दोघांचेही अभिनंदन...सदैव सुखी, आनंदी राहा." अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग