महाराष्ट्र

Kalyan : प्रसादाचे आमिष दाखवून चिमुकलीवर अतिप्रसंग, 58 वर्षांच्या आरोपीला अटक; कल्याणमधील धक्कादायक घटना

कल्याण पूर्वेतील परिसरात एक सात वर्षीय मुलगी आपल्या घरासमोर खेळत होती. त्या परिसरात राहणारा रामलखन यादव नावाचा व्यक्ती त्या मुलीजवळ आला.

Swapnil S

कल्याण : प्रसादाचे आमिष दाखवून कल्याणमध्ये एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका ५८ वर्षीय व्यक्तीने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी रामलखन यादव याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याण पूर्वेतील परिसरात एक सात वर्षीय मुलगी आपल्या घरासमोर खेळत असताना या परिसरात राहणारा रामलखन यादव नावाचा व्यक्ती त्या मुलीजवळ आला. मुलगी रामलखनला ओळखत होती. रामलखनने त्या मुलीला प्रसादाचे आमिष दाखवून तिला घरात नेले. घरात नेऊन मुलीसोबत त्याने अतिप्रसंग केला. घडला प्रकार मुलीने आईला सांगितला.

या प्रकरणात आईकडून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी रामलखन यादव याला अटक केली आहे. रामलखन हा हमालीचे काम करतो. पोलिसांनी रामलखनला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने रामलखन याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी हेमंत ढोले करीत आहेत.

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार