कराड : विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू 
महाराष्ट्र

कराड : विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेच्या धक्क्याने एकाच शिंदे कुटुंबातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबावरच मृत्यूचा घाला पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Swapnil S

कराड : सातारा जिल्ह्यातील  फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेच्या धक्क्याने एकाच शिंदे कुटुंबातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला.  एकमेकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबावरच मृत्यूचा घाला पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय ४८), गंगुबाई पिसुरड्या शिंदे (वय ४०), सचिन पिसुरड्या शिंदे (वय २६) आणि आरती पिसुरड्या शिंदे (वय २२) अशी एकाच वेळी मृत्यू पावलेल्या दुर्दैवी कुटुंबीयांची नावे आहेत.

खामगावजवळ गावाला लागूनच असलेल्या साखरवाडी ( पो.खामगाव)  येथे शिंदे कुटुंब वास्तव्यास आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास कुटुंबातील प्रमुख किसन शिंदे हे घराबाहेर पडले. तेथे घराबाहेर विद्युत तारेमध्ये वीज प्रवाह उतरला होता. पहाटेचा अंधार असल्यामुळे बहुदा किसन यांचा सदर तारेला स्पर्श झाला असावा. त्यांना विजेचा जोरदार झटका बसताच ते ओरडले.

ते सुटकेचा प्रयत्न करत असल्याचे पाहताच, त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी गंगुबाई, मुलगा सचिन आणि मुलगी आरती हे एकापाठोपाठ एक धावून आले. मात्र, वीजप्रवाह इतका तीव्र होता की, एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघेही एकमेकांना चिकटले. काही सेकंदांतच या संपूर्ण कुटुंबाचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

वीजप्रवाह आला कुठून?

 घराबाहेरील तारेमध्ये विद्युत प्रवाह नेमका कसा आणि कुठून आला, महावितरणचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे का याचा तपास सध्या सुरू आहे. शिंदे कुटुंबियांचा आवाज ऐकून शेजारच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र विद्युत वाहक तार पाहून कोणीही जवळ गेले नाही. मात्र त्यांनी याबाबतची माहिती वीज वितरण व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तात्काळ कळवली. त्यानंतर वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज प्रवाह खंडीत केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके