कर्जत-लोणावळा आणखी एक मार्गिका पूर्ववत; अनेक गाड्या मूळ मार्गावर पुन्हा वळविण्यात येणार, प्रवाशांना दिलासा 
महाराष्ट्र

कर्जत-लोणावळा आणखी एक मार्गिका पूर्ववत; अनेक गाड्या मूळ मार्गावर पुन्हा वळविण्यात येणार, प्रवाशांना दिलासा

Mumbai-Pune Railway : लोणावळा-कर्जत घाट परिसरात ६ जुलै रोजी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.

Swapnil S

मुंबई : लोणावळा-कर्जत घाट परिसरात ६ जुलै रोजी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेच्या पथकाने कर्जत आणि लोणावळा दरम्यानची दक्षिण-पूर्व ‘डाऊन’ मार्गिका यशस्वीरीत्या पूर्ववत केली.

गाडी क्रमांक ११३०२ बंगळुरू-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उद्यान एक्स्प्रेस, खडकी येथेच शॉर्ट टर्मिनेट केली जात होती. ही गाडी १७ जुलैपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत चालवली जाईल. गाडी क्रमांक १२११६ सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिद्धेश्वर एक्स्प्रेस, पुणे येथेच शॉर्ट टर्मिनेट केली जात होती, आता १७ जुलैपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत चालवली जाईल.

गाडी क्रमांक ११३०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस, पुणे येथून शॉर्ट ओरिजनेट करण्यात येत होती, ही गाडी आता १८ जुलैपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. गाडी क्रमांक १२११५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस, खडकी येथून शॉर्ट ओरिजनेट करण्यात येत होती, आता १८ जुलैपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल.

गाडी क्रमांक १७४११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस यापूर्वी रद्द करण्यात आली होती, आता १८ जुलैपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून तिच्या मूळ मार्गावरून चालविण्यात येईल. गाडी क्रमांक १७४१२ कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महालक्ष्मी एक्स्प्रेस यापूर्वी रद्द करण्यात आली होती, आता १९ जुलैपासून कोल्हापूर येथून तिच्या मूळ मार्गावरून चालविण्यात येईल. गाडी क्रमांक ०९४१९ अहमदाबाद-तिरुचिरापल्ली एक्सप्रेस १६ जुलै रोजी सुटणारी, सुरत-मनमाड-दौंड-सोलापूरमार्गे वळवण्यात आली होती, आता तिच्या मूळ मार्गावरून धावेल.

लोणावळा-कर्जत विभागातील रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेची टीम आव्हानात्मक परिस्थितीत अहोरात्र काम करत आहे.

रेल्वेने युद्धपातळीवर केली कामे

दोन मार्गिका पूर्ववत झाल्यामुळे अनेक गाड्या मूळ मार्गावर पुन्हा चालवल्या जाणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. भूस्खलन झाल्याने मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेने युद्धपातळीवर कामे हाती घेत ७ जुलै रोजी मध्य मार्गिका पूर्ववत केली होती. यानंतर दक्षिण-पूर्व ‘डाऊन’ मार्गिका पूर्ववत केली. यानंतर अनेक गाड्या मूळ मार्गावर पुन्हा वळविण्यात आल्या आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पुढील आठवड्यात बँका चार दिवस बंद; ११ सप्टेंबर रोजी बँक संघटनांचा संप

Mira-Bhayandar : ५.१४ लाख मतदारांपैकी २.१३ लाख नोंदी बाद

दहशतवादाविरुद्ध लढ्याचे मोदींचे आवाहन; शांघाय सहकार्य संघटनेत पाकिस्तानवर जोरदार टीका

'सहा लाख' मतदार वगळले; २ लाख ७० हजार मतदारांचा 'पत्ता'च नसल्याचे उघड, निवडणूक विभागाचा दावा

एक्स्प्रेसमध्ये दिवा लावून पूजा करणाऱ्या प्रवाशावर कारवाई; आरोपीवर विविध कलमांनुसार कारवाई