महाराष्ट्र

पैशासह किमती ऐवजासाठी केला प्रवाशाचा खून; ट्रकचालकास झाली जन्मठेपेची शिक्षा

प्रवाशाचा खून केल्याप्रकरणी ट्रक चालकास दोषी धरून जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांनी सुनावली.

Swapnil S

कराड : महामार्गावरून जात असलेल्या ट्रकला थांबवून त्या ट्रकने पुण्याहून कोल्हापूरला जात असताना वाटेत पैशांसाठी प्रवाशाचा खून केल्याप्रकरणी ट्रक चालकास दोषी धरून जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांनी सुनावली.संदीप शिवशंकराप्पा बुडगी (रा. बावीकेरे, ता. निलमंगला, जि. बेळगाव, सध्या रा. मुद्दापुरा, ता. जि. चित्रदुर्ग, कर्नाटक), असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे तर या खटल्यातील खून झाल्याचे स्वप्नील गणेश सुतार (रा. पेठवडगांव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे नाव असून त्याचा बुडगी याने चाकूने गळ्यावर वार करून खून केला होता.

स्वप्नील गणेश सुतार (रा.सोनार्ली वसाहत,पेठवडगांव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) हा मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी कोल्हापूरला जाण्यासाठी पुणे येथील बायपास रोडवरील नवले ब्रीज येथे एसटी बसची वाट पहात थांबला होता.मात्र रात्रीची वेळ असल्याने बराच वेळ बस न आल्याने तर काही बसेस तेथे न थांबल्याने त्याने तेथून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या एका आयशर टेम्पोला थांबण्याचा इशारा केला असता तो ट्रक थांबला.त्याट्रकमध्ये बसून रात्री साताऱ्यात आल्यानंतर ट्रकमधील अन्य प्रवासी उतरले असता तेथून पुढे स्वप्नील सुतार आणि आरोपी असे दोघेच ट्रकमध्ये होते.ट्रक कराडजवळ आल्यानंतर आरोपीने रात्रीच्या काळोख्या अंधाराचा फायदा घेत हायवेच्यासर्व्हिस रोडवरील एका निर्जन स्थळी ट्रक उभा करून प्रवाशी स्वप्नील सुतार याच्याकडे पैसे आणि किंमती वस्तुची मागणी केली.मात्र ते देण्यास त्याने नकार देतात पैसे आणि बॅग देत नाही म्हणून आरोपी ट्रक चालकाने चाकुचा धाक दाखवून त्याचे दोन्ही हात चिकटपट्टीने बांधून गाडीतून खाली उतरवले.जबरदस्तीने बॅग घेवुन त्याला ऊसाचे शेतात ओढत नेले.तो ओरडू लागल्याने आरोपीने चाकुने स्वप्नीलच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला व मृतदेह शेतात टाकून बॅगेतील साहित्य घेवून आरोपी पसार झाला होता.

दरम्यान,दुसऱ्या दिवशी सदर शेतात शेताचा मालक गेला असता त्याला शेतात मृतदेह दिसून येतातत्याने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली.पोलिसांनी तपास करून आरोपी संदीपशिवशंकराप्पा बुडगी याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला होता.गुन्ह्याचा तपास केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्रदाखल केले होते.या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील आर. डी. परमाज यांनी एकूण १८ साक्षीदार तपासले.मयताचा मित्र करण सुभाष बाबर याची साक्ष महत्वाची ठरली.वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एल. कुराडे व डॉ. एस. जे. सावंत, तपास अधिकारी आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक क्षिरसागर यांची साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी