'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

उन्हाळ्यात जपून! ब्रँडेड कंपनीच्या कुल्फीत भेसळ; वनस्पती तेल अन् फॅटचा वापर; अन्न व औषध विभागाची धाड, १८५६ पॅकेट्स जप्त

अहिल्यानगर अन्न आणि औषध प्रशासनाने भेसळयुक्त कुल्फीविरोधात कारवाई करत कुल्फीची तब्बल १ हजार ८५६ पॅकेट्स जप्त केली आहेत. त्यामुळे, ऐन उन्हाळ्याच्या सिझनमध्ये थंडगार, शीतपेय विकणाऱ्या व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

Swapnil S

अहिल्यानगर : सध्या उन्हाचा पारा सतत वाढत असल्याने थंड सरबत, शीतपेय घेण्यासाठी, पिण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढलेली दिसत आहे. बाजारात अनेक प्रकारच्या कुल्फी आणि ब्रँडेड कंपनीचे आईसक्रीमही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, अशावेळी काहीजण परिस्थितीचा गैरफायदा घेऊन ग्राहकांना लुबाडण्याचा व आरोग्याशी खेळण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करत असतात. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन सरसावले आहे. या विभागाच्या पथकाने धाड टाकून एका ब्रँडेड कंपनीच्या कुल्फीत भेसळ असल्याचे उघडकीस आणले आहे.

अहिल्यानगर अन्न आणि औषध प्रशासनाने भेसळयुक्त कुल्फीविरोधात कारवाई करत कुल्फीची तब्बल १ हजार ८५६ पॅकेट्स जप्त केली आहेत. त्यामुळे, ऐन उन्हाळ्याच्या सिझनमध्ये थंडगार, शीतपेय विकणाऱ्या व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे हे पॅकेट्स नामांकित कंपनीचे असून त्यामध्ये वनस्पती तेल आणि फॅटचा वापर करण्यात आला असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या कारवाईच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

जप्त साठ्याचे नमुने पाठविले प्रयोगशाळेत

अन्नसुरक्षा आणि कायद्यानुसार आईस्क्रीम व कुल्फी या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे वनस्पती तेल किंवा फॅट वापरण्यास सक्त मनाई आहे. मात्र, तपासणी दरम्यान संबंधित कुल्फींमध्ये अशा घटकांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिली. दरम्यान, जप्त साठ्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नियमभंग सिद्ध झाल्यास कठोर कारवाई

अधिकारी बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनमार्फत उत्पादीत आणि पुरवठा होणार्‍या कुल्फींमध्ये भेसळ होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार, शहरातील वितरकांना माल पुरवठा करणार्‍या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कुल्फीचा साठा आढळून आला आणि तो तत्काळ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीला खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, नियमभंग सिद्ध झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

पुण्यातील वरिष्ठ शास्त्रज्ञाला 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात ओढले; सायबर चोरट्यांनी तब्बल ७८ लाख रुपये लुटले

रायगडावर प्री-वेडिंग शूटमुळे वाद; शिवसमाधी परिसरातील व्हिडीओ व्हायरल

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी

IPL 2026 : चिन्नास्वामीत गोलंदाजांचा कस; बंगळुरू-लखनऊमध्ये आज लढत; फलंदाजांकडून धावांचा वर्षाव अपेक्षित

खरातशी कोणताही संबंध नाही; २८ दिवसांनंतर रुपाली चाकणकर यांचा खुलासा