लासलगावसह चार तालुक्यांतील सिलिंडर पुरवठा ठप्प; ३० हजार गॅस ग्राहक त्रस्त, रास्ता रोको आंदोलनाचा इशारा प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

लासलगावसह चार तालुक्यांतील सिलिंडर पुरवठा ठप्प; ३० हजार गॅस ग्राहक त्रस्त, रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

ऐन सणासुदीच्या काळात लासलगावसह निफाड, चांदवड आणि येवला तालुक्यांतील सुमारे ३० हजार घरगुती गॅस ग्राहकांना सिलिंडरच्या अनियमित पुरवठ्याचा फटका बसत आहे.

Swapnil S

लासलगाव : ऐन सणासुदीच्या काळात लासलगावसह निफाड, चांदवड आणि येवला तालुक्यांतील सुमारे ३० हजार घरगुती गॅस ग्राहकांना सिलिंडरच्या अनियमित पुरवठ्याचा फटका बसत आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या जाधव गॅस एजन्सीकडून गेल्या १० ते १२ दिवसांपासून गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे. बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

सध्या सण-उत्सवांचे दिवस सुरू असल्याने घराघरांत स्वयंपाकाची लगबग आणि पाहुण्यांची वर्दळ आहे. अशा काळातच गॅस सिलिंडर मिळत नसल्याने गृहिणींसह सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बुकिंग करून अनेक दिवस उलटूनही सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने स्वयंपाकाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित एजन्सीच्या कारभाराबाबत ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

लासलगाव, निफाड, चांदवड आणि येवला तालुक्यांतील सुमारे ३० हजार ग्राहक जाधव गॅस एजन्सीच्या कार्यक्षेत्रात येत असल्याचे सांगण्यात येते. एवढ्या मोठ्या संख्येने ग्राहक अवलंबून असताना गॅस वितरण विस्कळीत झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या गंभीर समस्येकडे निफाडचे तहसीलदार तसेच हिंदुस्थान पेट्रोलियमच्या वरिष्ठ पुरवठा अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन गॅस वितरण पूर्ववत करावे. ग्राहकांनी केलेल्या बुकिंगनुसार त्यांना वेळेत सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी लासलगाव शहर विकास समितीने केली आहे.

येत्या काही दिवसांत गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर नागरिकांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लासलगाव शहर विकास समितीने स्थानिक प्रशासन आणि गॅस कंपनीला दिला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी संबंधित प्रशासन आणि एजन्सीवर राहील, असेही समितीने स्पष्ट केले.

समितीचे प्रकाश पाटील, संदीप उगले, धर्मेश जाधव, राजेंद्र कराड, चंद्रकांत नेटारे, विकास कोल्हे, शेखर कुलकर्णी, प्रमोद पाटील, उत्तम वाघ, अनिल भावसार, संतोष बोराडे, महेश बकरे आणि अनिल भागवत यांनी गॅस पुरवठा तातडीने नियमित करण्याची मागणी केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सेवानिवृत्त झालेल्या महिलेचा पेन्शनवरील हक्क कायम; उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Tiger Shroff Firing: हल्ल्यात वापरलेली दुचाकी संशयाच्या भोवऱ्यात; मालकी हस्तांतरणाची अधिकृत नोंद नाही

Navi Mumbai: कांदळवनात फेकली ब्रँडेड दूध, दह्याची १०० पाकिटे; FDA च्या कारवाईच्या भीतीने पाकिटे फेकल्याची शक्यता

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीचा रक्तरंजित थरार! गोळी लागून एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मृतदेहाची परस्पर लावली विल्हेवाट

अन्य देशांच्या आंदोलनाशी तुलना नको - अभिजीत दिपके