लासलगाव : दर जाहीर होईपर्यंत ऊसतोड बंद ठेवा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी (Photo-X)
महाराष्ट्र

लासलगाव : दर जाहीर होईपर्यंत ऊसतोड बंद ठेवा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

ऊसदर जाहीर होईपर्यंत नाशिक जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांनी ऊसतोड सुरू करू नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.

Swapnil S

लासलगाव : ऊसदर जाहीर होईपर्यंत नाशिक जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांनी ऊसतोड सुरू करू नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. कादवा, सहकार महर्षी शंकरराव काळे, रानवड सहकारी साखर कारखाना तसेच ग्रेनॉच इंडस्ट्रीज लि. आणि केजीएस शुगर अँड बायो एनर्जीज लिमिटेडच्या चेअरमन व कार्यकारी संचालकांना हे निवेदन देण्यात आले.

खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली १० ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या ऊस परिषदेत साखरेला प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलला प्रतिलिटर ८० रुपये दर निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत दिल्ली येथे झालेली शेतकरी नेत्यांची बैठक निष्फळ ठरल्याचे संघटनेने म्हटले आहे. केंद्र सरकारने ऊसदराच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेईपर्यंत कारखानदारांनी ऊसतोड सुरू करू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. राज्यात ऊसदराच्या प्रश्नावर आंदोलन सुरू असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखानदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निवेदनावर नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांच्यासह प्रभाकर बेंडकुळे, विलास दरगुडे, गजानन घोटेकर आणि सोमनाथ कावळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : पॅकिंग खर्च वाढल्याने मसाल्यांचे दर वाढणार; अन्न व औषध प्रशासनाच्या निर्णयाचे पडसाद

नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ४५ हजारांचे सानुग्रह अनुदान; महासभेची मंजुरी

जयशंकर, रुबिओ यांच्यात २० ऑक्टोबरला चर्चा होणार; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तनाचा आरोप; IAS अधिकाऱ्याच्या चौकशीचे जम्मू-काश्मीर सरकारचे आदेश

Mumbai : महसूल अधिकाऱ्यांना हायकोर्टाचा दणका; पुनर्विकास रखडल्याबद्दल ७ लाखांचा दंड