अभिजीत दीपके यांच्या विरोधात गुन्हा दाखल; शासकीय शाळेत विनापरवाना प्रवेश, शिक्षकांना धमकी 
महाराष्ट्र

अभिजीत दीपके यांच्या विरोधात गुन्हा दाखल; शासकीय शाळेत विनापरवाना प्रवेश, शिक्षकांना धमकी

शासकीय शाळेत विनापरवाना प्रवेश करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि शिक्षकांना धमकी देणे याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संयोजक अभिजीत दीपके आणि इतरांविरोधात जिल्ह्यातील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Swapnil S

लातूर : शासकीय शाळेत विनापरवाना प्रवेश करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि शिक्षकांना धमकी देणे याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संयोजक अभिजीत दीपके आणि इतरांविरोधात जिल्ह्यातील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षिका सय्यद शमशादबानो खैरातअली (५३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. दीपके हे लातूर जिल्ह्यातील शाळांना भेटी देत असून, सीजेपीच्या सुरू असलेल्या 'शाळा ठीक करो' अभियानाचा एक भाग म्हणून तेथील समस्या मांडत आहेत.

तक्रारीनुसार, ही कथित घटना औसाजवळील जावळी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत घडली. दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परवानगीशिवाय शाळेत प्रवेश केला, विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसले आणि त्यांना विविध प्रश्न विचारले; ज्यामुळे शैक्षणिक आणि शासकीय कामात अडथळा निर्माण झाला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, सीजेपी नेत्याने या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण केले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले, असे तक्रारीत म्हटले आहे.

दीपके यांच्या भेटीदरम्यान दुसऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणून वर्गात बसवले होते, असा दावा करून त्यांनी शाळेची बदनामी केली. तसेच शिक्षकांना निलंबित करण्याची धमकी दिली. भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२ (लोकसेवकाला त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर), ३२९(३) (अनधिकृत प्रवेश/घरफोडी), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) आणि ३५६ (२) (गुन्हेगारी मानहानी) अंतर्गत हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

Truecaller शिवाय कळणार कोण करतंय फोन? रिंग वाजताच स्क्रीनवर दिसणार नाव; १ नोव्हेंबरपासून नवा नियम

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या २४ विशेष फेऱ्या; १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार

मराठवाड्यात भूजलपातळीत घट; संभाजीनगरात १६९ टँकर सुरू

लग्नाची गोष्ट, पण यावेळी मुलींच्या नजरेतून! 'लग्न आणि बरंच काही' टीमच्या नवशक्तिसोबत खास गप्पा; पूजा म्हणते, 'लग्न करायचं, पण...'